Home चंद्रपूर शिक्षणाच्या आयचा घो :- ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा ग्रामीण भागात फज्जा?

शिक्षणाच्या आयचा घो :- ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा ग्रामीण भागात फज्जा?

 

गरिबांच्या मुलांना स्मार्टफोन अभावी वंचित रहावं लागलय तरीही ना शाळा, ना शिक्षक, विद्यार्थी मात्र वरच्या वर्गात?

मनोहर खिरडकर :-(खांबाडा )

मागील वर्षी सुरू झालेल्या कोरोना महामारीमुळे
मार्चमध्ये शाळा बंद केल्या आणि संपूर्ण शैक्षणिक वर्ष कोरोनाच्या दहशतीत गेले, आता नविन शैक्षणिक वर्ष उजाडले तर वाटले की आता तरी सर्व सुरळीत होईल, पण तसे न होता, पुन्हा लॉकडाउन आणि कोरोनाचा प्रकोपाने शासनाला अखेर शाळा, विद्यालय बंदच ठेवावे लागले, मात्र, राज्यांच्या शिक्षण खात्याने ऑनलाईन शिक्षण पद्धती अवलंबली आणि अगदी प्राथमिक पूर्व शाळेच्या विद्यार्थ्याडे सुद्धा स्मार्ट फोन आला. मात्र ह्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे शिक्षण ग्रामीण भागात देणे अशक्य आहे, कारण मोबाईल आहे पण नेटवर्कच नाही अशी परिस्थिती आहे, त्यामुळे त्याचा फारसा उपयोग झाला नाहीं.

कोरोना च्या आर्थिक मंदीत पालकांकडे पैसे नसतांना कसेतरी प्रत्येक पालकाने मुलांच्या शिक्षणासाठी स्मार्टफोन खरेदी केले पण दुर्दव्य सर्व परिक्षा रद्द केल्या आणि पहिली ते नववीपर्यंत विद्यार्थ्यांना पुढिल वर्गात प्रवेश देण्याचे धोरण शिक्षण विभागाने घेतले. खरं तर ग्रामीण भागातील अनेक कुटुंबातील पालकांना स्मार्टफोन कसा हाताळावा हेच कळत नसल्याने तारांबळ उडाली. रोजीरोटिकरीता मंजुरी करून पोट भरणारे मजुरवर्ग जास्त प्रमाणात आहे. त्यांना काम केल्या खेरीज पर्यायच नसतो त्यांच्याकडे मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्याकडे वेळही मिळाला नाही, काही पालकांकडे तुटपुंजी मिळकत असल्याने स्मार्टफोन आणायचा कुठून ? असा प्रश्न पडला आहे. साधा फोनच उपलब्ध नसल्याने हा महागडा फोन खरेदिसाठी साधी ऐपतही नाही यामुळे त्यांचे पाल्य या शिक्षणापासून वंचित राहिले नाईलाजास्तव मुलांना शिक्षणासाठी फोन घेवून द्यावे लागत असले तरी मुलांना चौथीपर्यंत फार ज्ञान कमी असते परंतु मोबाईल वर अभ्यासक्रम कळण्यासाठी ग्रामीण भागातील पालकांची चांगलीच कोंडी झाली,

ज्या गरीब घरच्या मुलांनी पहिलीची शाळा कशी आहे ? हे सुद्धा पाहिले नाही. पण त्यांना दुसरीच्या वर्गात प्रवेश देण्याचे धोरण शासनाने जाहीर केले यामुळे या विद्यार्थ्यांना अ,आ इ, आई ची बाराखडी आणि पाढेही झाले नसताना या मुलांनी मात्र पहिलीतुन दुसरीत उडी मारली, त्यामुळे आता परत दुसरीतील मुलांना पांढे आणि बाराखडी शिकवण्यासाठी शिक्षकांना परत वेळ द्यावा लागणार आहे. शिक्षक व शाळा न बघताच विद्यार्थी पास झाले दुसरीत जावूनही या मुलांना काही येईल की नाही? याची हमी देणे कठिण बनले आहे. ऑनलाईन शिक्षणाचा ग्रामीण भागात फारसा उपयोग झाला नाही, यामुळे या भागातील विद्याथ्र्यांचा शैक्षणिक प्रशन ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here