Home चंद्रपूर खाद्यपदार्थ विकणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यावर धावत्या रेल्वेत कारवाई: कॅटरिंग ईन्स्पेकटरची कारवाई

खाद्यपदार्थ विकणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यावर धावत्या रेल्वेत कारवाई: कॅटरिंग ईन्स्पेकटरची कारवाई

खाद्यपदार्थ विकणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यावर धावत्या रेल्वेत कारवाई: कॅटरिंग ईन्स्पेकटरची कारवाई

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर

नागपूर : परवानगी नसताना रेल्वेगाडीत वेगवेगळे खाद्य पदार्थ विकणाऱ्या ८ जणांना अटक करण्यात आली. महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी बडनेरा ते नागपूर दरम्यान रेल्वे केटरिंग इन्स्पेक्टरकडून ही कारवाई करण्यात आली.

रेल्वे गाड्या अथवा स्थानकावर खाद्य पदार्थ विकण्यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) कडून परवानगी घ्यावी लागते. मात्र, विविध रेल्वे गाड्यांमध्ये अनेक जण कोणतीही परवानगी न घेता दर्जाहिन खाद्यपदार्थ विकून प्रवाशांच्या आरोग्याशी, जिविताशी खेळ करीत असतात. त्यांच्यावर अंकूश लावण्याची जबाबदारी आयआरसीटीसीच्या प्रतिनिधींसह केटरिंग इन्स्पेक्टरची असते. मात्र, त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ चालू असतो. असे प्रकार अलिकडे वाढल्याची ओरड उठल्यामुळे शुक्रवारी आयआरसीटीसीचे प्रतिनिधी आणि कॅटरिंग ईन्स्पेक्टरच्या पथकाने बडनेरा येथून महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये तपासणी सुरू केली. वेगवेगळ्या डब्यात खाद्यपदार्थ विकणारे ८ जण त्यांच्या हाती लागले. आम्ही आर अॅन्ड के असोसिएटशी संबंधित अधिकृत खाद्य पदार्थ विक्रेते असल्याचे सांगून त्यांनी तपासणी अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे कागदपत्रे तपासली असता कोणाच कडे मूळ प्रवासी प्राधिकरण किंवा आयआरसीटीसीने जारी केलेले ओळखपत्र नसल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांची कसून विचारपूस केली असता ते अनधिकृत विक्रेते असल्याचे उघड होताच तपासणी पथकाने त्यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here