Home वरोरा वरोरा न.प.चे नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांची काविड ग्रस्थांना स्वतःजवळून आर्थिक मदत.

वरोरा न.प.चे नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांची काविड ग्रस्थांना स्वतःजवळून आर्थिक मदत.

 

दूषित पाण्यामुळे काविड आजाराने त्रस्त रुग्णांना मिळाला आर्थिक आधार.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा शहरातील कमला नेहरु प्रभागातिल चीरघर प्लाट वार्डातील काही नागरिकांना दूषित पाणी पिल्याने काविड हा आजार झाला होता या संदर्भात आरोग्य विभागाचे सर्वेक्षण झाल्यानंतर त्या नागरिकांना नगर परिषद वरोरा तर्फे आर्थिक मदत देण्यात आली होती परंतु नगर परिषद कडून दिलेल्या मदतीमध्ये काही नागरिक वंचित राहले होते आशा लोकानी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांना आपली व्यथा सुनावली त्यामुळे ही बाब लक्षात घेता अहेतेशाम अली यांनी वंचित राहलेल्या लोकांना मी स्वता मझाकडून आर्थिक मदत करणार असा शब्द दिला होता.

तो शब्द नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी पूर्ण करत काविड ग्रस्त नागरिकांना स्वता संम्पर्क साधुन व त्यांना बोलाऊंन आपल्या परिवारा तर्फे आर्थिक मदत करून चीरघर प्लाट मधिल नागरिकांना सहकार्य केले. दिलेला शब्द पाळल्या बद्दल व दिलेल्या शब्दांनुसार आर्थिक सहकार्य केल्याबद्दल नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.

Previous articleमदतकार्य :- सीडीसीसी बैँकेच्या शेतकरी कल्याण निधी अंतर्गत मृतकाच्या पत्नीस मदतीचा हात.
Next articleशिक्षणाच्या आयचा घो :- ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा ग्रामीण भागात फज्जा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here