Home भद्रावती मदतकार्य :- सीडीसीसी बैँकेच्या शेतकरी कल्याण निधी अंतर्गत मृतकाच्या पत्नीस मदतीचा हात.

मदतकार्य :- सीडीसीसी बैँकेच्या शेतकरी कल्याण निधी अंतर्गत मृतकाच्या पत्नीस मदतीचा हात.

 

सीडीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे यांचा पुढाकार.

भद्रावती प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी कल्याण निधी या योजने अंतर्गत व चंजिम सह. बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या मार्गदर्शनाखाली तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे यांच्या पुढाकाराने चिचोली येथील जंगली जनावराने ठार मारलेल्या शेतमजुराच्या पत्नीला 10 रुपये रोख रकमेचा धनादेश देऊन एका छोटेखानी समारोहात तिच्या दुःखद स्थितीत मदतीचा हात दिला.

दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी, शेतमजुरांच्या मदतीला नेहमीच धावून येत असून जिल्हा बँकेच्या भद्रावती तालुक्यातील चोरा शाखेने सामाजिक बांधीलकी जोपासत संचालक रविंद्र शिंदे यांच्या माध्यमातून दि. 5 मे रोजी बँकेच्या दालनात शेतकरी कल्याण निधी अंतर्गत चिचोली येथील शेतमजूर मोरेश्वर श्रीरामे यांचेवर जंगली जनावराने ठार केल्याने त्या मृतकाची पत्नी शालू श्रीरामे हिला 10 हजार रोख रकमेचा धनादेश देऊन मदत दिली.

याप्रसंगी चोरा आदिवासी संस्थेचे अध्यक्ष बी. टी. जांभुळे, उपाध्यक्ष गुंडू चौधरी, संस्थेचे व्यवस्थापक विकास दोहतरे, बँकेचे व्यवस्थापक विजय खंगार, निरीक्षक पवन ठाकरे, कोषपाल एस. डी. ठेंगणे आदी उपस्थित होते. शिवाय धानाचे पुंजने जळून नुकसान होणे , बैल मृत्युमुखी पडणे, वीज पडून जीवहानी होणे, जंगली जनावराच्या हल्यात मृत्यू होणे अशा घटना घडल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधून आर्थिक मदत मिळवून घ्यावी असे आवाहन बैँकेचे अध्यक्ष संतोष रावत व माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्यासह बैँकेच्या संचालकांनी केले आहे.

Previous articleक्राईम न्यूज :- विदर्भातील अनेक जिल्ह्यात सोने चोरी करणाऱ्या अट्टल चोराला चंद्रपूर पोलीसांनी केली अटक
Next articleवरोरा न.प.चे नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांची काविड ग्रस्थांना स्वतःजवळून आर्थिक मदत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here