Home भद्रावती दखलपात्र :- केपीसीएल कंपनी विरोधात बरांज वाशीय महिलांनी आंदोलन का मागे घेतले?

दखलपात्र :- केपीसीएल कंपनी विरोधात बरांज वाशीय महिलांनी आंदोलन का मागे घेतले?

दलालांच्या माध्यमातून अफवा पसरवून डाव साधण्याचा प्रयत्न महिलांनी हाणून पाडला, सत्य आलं समोर.

भद्रावती प्रतिनिधी :-

तालुक्यातील बरांज के.पी.सी.एल. कंपनीच्या कोल माईन्स लि. चे प्रकल्पग्रस्त गावकरी व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा त्वरित मोबदला देऊन व त्यांच्या गावाचे पुनर्वसन करावे यासाठी तब्बल 70 दिवस आंदोलन करणाऱ्या महिलांचे आंदोलन काही मागण्याच्या मोबदल्यात कोळसा खाणीत आमरण उपोषण करणाऱ्या महिलांनी मागे घेतले होते, पण कोळसा खाणीच्या वर पेंडाल टाकून उपोषण आंदोलन सुरूच होते, दरम्यान कोळसा खाणितील आंदोलन करणाऱ्या जॉबाज महिलांनी कंपनी प्रशासनाला हादारावून सोडले होते त्यामुळे तब्बल आठ दिवसानंतर कंपनी प्रशासनाला कोळसा खाणीत उतरून आंदोलन करणाऱ्या महिलांच्या मागण्या संदर्भात पत्र देऊन आपण आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती करावी लागली आणि कोळसा खाणीतील आंदोलन मागे घेण्यात आलं.परंतु अफवांचा बाजार भरवून महिलांची दिशाभूल करणाऱ्या काही दलालांनी काही महिलांना समोर करून कंपनी समोर वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे चित्र दिसत आहे.

जवळपास 70 दिवसापासून बरांज गावातील पुनर्वसन महिला मंडळ, (बंराज मोकासा) उपोषण आंदोलन करत होत्या व कंपनी प्रशासनाने त्यांच्या प्रमुख मागण्यासंदर्भात ठोस पाऊले न टाकता केवळ मोगम आश्वासने देऊन वेळकाढुपणा चालवलेला होता, कोळसा खाणीत आंदोलन करणाऱ्या महिलांनी स्वतःची छोटी छोटी मुलं घरी ठेऊन कोळसा खाणीच्या पाण्यात आत्मदहन करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता अशा वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी महिलांचे संरक्षण करत त्यांच्या न्यायोचित मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न चालवला होता व मुंबई च्या मनसे पदाधिकाऱ्यांनी कोळसा खाणीत आंदोलन करणाऱ्या महिलांची भेट घेऊन हा विषय मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवून न्याय मिळवून देण्याची हमी त्यांनी आंदोलन करणाऱ्या महिलांना दिली होती, दरम्यान दुसऱ्या दिवशी कंपनी प्रशासनाने मनसेच्या आक्रमक संभावित खळखट्याक आंदोलनाची दखल घेऊन महिलांच्या आंदोलनातील मागण्या मान्य केल्या व त्याची अमलबजावणी कारण्याची हमी दिल्याननंतर मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कंपनी व्यवस्थापनातील अधिकारी व पोलीस प्रशासनातील अधिकारी यांच्या तडजोडीने कोळसा खाणीतील आंदोलन मागे घेण्यात आलं, परंतु त्यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी प्रसारमाध्यमाना स्टेटमेंट देतांना म्हटले होते की हे कोळसा खाणीतील आंदोलन मागे घेण्यात आले पण जोपर्यंत बरांज वासिय महिलांच्या पूर्ण मागण्या मान्य होतं नाही तोपर्यंत कोळसा खाणीच्या वर पेंडाल मधील आंदोलन सुरूच राहणार.

उपोषण आंदोलनाचा पेंडाल कुणी काढला?

बरांज वासीय महिलांचे कोळसा खाणितील आंदोलन जरी मागे घेण्यात आले होते तरी कोळसा खाणीच्या वर पेंडाल टाकून आंदोलन करणाऱ्या महिलांचे आंदोलन सुरूच होते, पण काही दिवसांनांतर पेंडाल मध्ये उपोषण करिता येणाऱ्या महिला अचानक येणे बंद झाल्या, त्या मंडपात महिला ऐवजी पोलीस शिपाई व गार्ड दिसत होते, दुसरीकडे ज्या मंडप डेकोरेशन चा पेंडाल होता त्याचे बिल पावनेदोन लाखावर पोहचले होते अशातच आता हे बिल कोण देणार? हा प्रश्न पुढाकार घेणाऱ्या काही महिलांना पडला, दरम्यान मंडपात महिला बसत नव्हत्या आणि पेंडालचा किराया द्यायचा कसा? हा प्रश्न उपस्थित राहिल्यांनी शेवटी काही महिलांनी कंपनी व्यवस्थापनाने आंदोलन करण्यास आम्हास भाग पाडले त्यामुळे हा खर्च कंपनीने द्यावा अशी मागणी कंपनी कडे केली होती व कंपनीला सुद्धा त्यांचा हा खर्च उचलणे भाग पडले आणि पोलीस प्रशासनाकडे ज्याअर्थी मागण्या संदर्भात पूर्तता करण्यात आली त्याअर्थी तिथे पेंडाल टाकून बसने उचित नव्हते त्यामुळे पेंडाल टाकणाऱ्या व्यक्तीचे बिल देण्याच्या शर्तीवर पेंडाल काढण्यात आला, पण पुन्हा एकदा काही दलाल सक्रिय झाले आणि त्यानी काही महिलांना हुसकावून गावातील महिलांना गोळा करून कंपनी च्या कार्यालयात मंडप कुणी काढला याचा प्रश्न विचाराण्यासाठी पाठवले, दरम्यान ज्या महिलांनी आंदोलनात भाग घेतला त्यांना 70 दिवसाची रोजी देण्याची पण मागणी करण्यात आली. जी कंपनीने मान्य करावी अशी अपेक्षा आहे.

कंपनीने पूर्ण मागण्या मान्य न केल्यास पुन्हा आंदोलन करणार, महिलांचा इशारा.

केपीसील कंपनीने आंदोलन करणाऱ्या महिलांच्या मागण्या मान्य करून त्यासंदर्भात पाऊले उचलून गावातील घरांचे सर्व्हे सुरु केले, विशेष म्हणजे कंपनी सन 2016 च्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मूल्यांकणानुसार घराची किंमत द्यायला तयार होते ते आता चालू वित्तीय वर्षातील 2024 च्या मूल्यांकणानुसार किंमत द्यायला तयार आहे. त्यामुळे घरांचे मूल्यांकन 1100 रुपयापासून 1700 रुपये वर्ग फूट प्रमाणे मूल्य मिळणार आहे हे महिलांच्या आंदोलनाचे यश आहे हे लक्षात घ्यायला हवे, सोबतच शेताचे मूल्यमापन सुद्धा असेच व्हायला हवे अशी अपेक्षा आहे, अर्थात जर कंपनी ने मान्य केलेल्या मागण्याची पूर्तता केली नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू असा इशारा आंदोलनकारी महिलांनी दिला आहे.

त्या महिलांच्या आक्रमक आणि लढाऊ बाण्याला सलाम!

बरांज वासीय महिला जेंव्हा आंदोलन करत होत्या तेंव्हा हा प्रश्न पडला होता की गावातील पुरुष मंडळी नेमकी काय करत आहे? कदाचित हे पहिले असे आंदोलन असेल जिथे पुरुषांना आंदोलनात सहभाग होण्यास मनाई होती, कारण मागील अनेक वर्ष या गावातील काही कंपनी दलाल यांच्या मोहाला बळी पडून पुरुष मंडळींनी आपल्या हक्क अधिकाराची लढाईचं संपवली होती, सन 2016 मध्ये काही मोरक्यानी परस्पर करार करून बाकी लोकांना अंधारात ठेवले होते त्यामुळे पुरुष मंडळी आता गावाच्या प्रकल्पग्रस्ताना न्याय मिळवून देऊ शकत नाही म्हणून काही महिला पुढे आल्या व आपल्या अस्तित्वाची लढाई आंदोलनाच्या माध्यमातून सुरु केली, कंपनीआमरण उपोषणाला दाद देत नाही म्हणून 100 फूट खोलवर कोळसा खाणीत उतरून महिलांनी आंदोलन सुरु केले व प्रशासनाला सळोकी पळो करून सोडले त्या सर्व आक्रमक बहाद्द्र लढाऊ महिलांना खरोखरच सलाम करावा अशीच त्यांची कामगिरी होती. कारण स्वतःची छोटी छोटी मुलं घरी ठेऊन मर्दानी महिला कोळसा खाणीत उतरून कंपनी प्रशासनासोबत लढत होत्या आणि शेवटी प्रशासनास दखल घेण्यास त्यांनी भाग पाडले, सलाम त्या सर्व महिलांना…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here