Home चंद्रपूर चंद्रपूरकर रमले आठवणीच्या गावात, पारंपारिक खेळाला चंद्रपूरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद

चंद्रपूरकर रमले आठवणीच्या गावात, पारंपारिक खेळाला चंद्रपूरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

आ. किशोर जोरगेवार यांचे आयोजन, 17 खेळांमध्ये 10 हजार महिलांनी घेतला सहभाग

चंद्रपूर  :-  आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आयोजित चला आठवणीच्या गावात या महिलांकरिता खेळांच्या क्रीडा उत्सवाला चंद्रपूरकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून यावेळी खेळल्या गेलेल्या 17 खेळांमध्ये जवळपास 10 हजार महिलांनी सहभाग घेतला. यावेळी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे वितरित करण्यात आले.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सदर क्रिडा उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कल्याणी किशोर जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर अध्यक्षा वंदना हातगावकर, तपस्या सराफ, सायली येरणे, माजी नगर सेविका सुनिता लोढीया, माता महाकाली सेवा समीतीचे सचिव अजय जयस्वाल, उज्वला नलगे,

शाहिस्ता खान पठाण, डाॅ. जेबा निसार, सोनम खोब्रागडे, डाॅ. नियाज खान, डाॅ. अंजुम कुरेशी, सुचिता अगासे, वैशाली बदनोरे, सुमेधा श्रिरामे, परविण पठाण आदींची प्रामूख्यतेने उपस्थिती होती.

Previous articleअर्थसंकल्पात बेरोजगार युवक, शेतकरी, जनसामान्यांकरीता कुठले स्थान नाही: चोखरे
Next articleदखलपात्र :- केपीसीएल कंपनी विरोधात बरांज वाशीय महिलांनी आंदोलन का मागे घेतले?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here