Home धक्कादायक सनसनीखेज:- विदर्भातील पाच लोकसभा निवडणूकीचे निकाल धक्कादायक लागणार?

सनसनीखेज:- विदर्भातील पाच लोकसभा निवडणूकीचे निकाल धक्कादायक लागणार?

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी च्या सामन्यात कुणाला किती जागा? चंद्रपुरात घडणार परिवर्तन?

चंद्रपूर :-

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या ‘उत्सवा’ला शुक्रवार दिनांक 19 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर-वणी आर्णी या पाच मतदारसंघातही शुक्रवारी मतदान झाले, पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१९ च्या निवडणुकीत पाच पैकी चार जागा भाजप-सेना युतीने तर एक जागा काँग्रेसने जिंकली होती. मात्र २०२४ मध्ये चित्र वेगळे आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निवडणुकीत महत्वाचा ठरला आहेत. पाचही ठिकाणी भाजपा महायुती विरुद्ध कांग्रेस महाविकास आघाडी अशी थेट लढत असून जेव्हा -जेव्हा अशी थेट लढत आहे, दरम्यान थेट लढतीत सत्ताधाऱ्यांना फटका बसतो असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे यावेळी मतदारांनी नेमकी काय भूमिका घेतली असेल यावर पत्रकाराचं मंथन आणि उमेदवरांचं चिंतन सुरु आहे, दरम्यान प्रत्येक उमेदवार हा विजय आपलाच व गुलाल आपणच उधळणार या रंगीन स्वप्नात वावरत आहे, परंतु हृदयाचे ठोके सुद्धा त्यांचे तेवढेच वाढलेले दिसत आहे, गावागावातील पुढाऱ्यांच्या जर तर च्या भाषेने सुद्धा उमेदवारांच्या धाकधुकीत रात्रीची झोपमोड होतं आहे,

विदर्भातील पाच मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा लढतीत नागपूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे नितीन गडकरी विरुद्ध महाविकास आघाडीचे विकास ठाकरे अशी लढत होणार आहे, नागपूर लोकसभा क्षेत्र हे भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्वाचे असून या लोकसभा क्षेत्रात राष्ट्रीय स्वयंमसेवक संघांचे मुख्यालय आहेत तर नितीन गडकरी यांना मानणारा मोठा वर्ग नागपूर लोकसभा क्षेत्रात आहे, पण कांग्रेस चे विकास ठाकरे यांनी जोरदार टक्कर देत मी माझा लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार नाही, बैनर लावणार नाही व मते सुद्धा मागणार नाही असे म्हणणारे प्रचार नितीन गडकरी यांना त्यांनी घाम फोडला फोडला होता व त्यामुळे त्यांना गल्लोगल्ली प्रचार करावा लागला, अर्थात ही निवडणूक महाविकास आघाडी यांच्यासाठी फायद्याची तर मोदी विरोधात लाट असल्याने भाजप करिता तोट्याची निवडणूक ठरली आहे, इथे नितीन गडकरी फार कमी फरकाने विजयी होतील असा अंदाज आहे, रामटेक मतदारसंघ महायुतीचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे शामकुमार बर्वे अशी सरळ लढत आहे पण इथे महाविकास आघाडीचे शामकुमार बर्वे यांना बढत मिळण्याची शक्यता आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघ महायुतीचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध महाविकास आघाडीचे प्रतिमा धानोरकर असा दुहेरी सामना रंगणार आहे, पण इथे कांग्रेस उमेदवार यांना जनमतांचा मोठा पाठिंबा असतांना सुद्धा नियोजन ढेपाळलं असल्याने भाजप चे मुनगंटीवार निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, भंडारा-गोंदिया मतदारसंघ महायुतीचे सुनील मेंढे विरुद्ध महाविकास आघाडीचे डॉ.प्रशांत पडोळे असा सामना होता त्यात कांग्रेस चे डॉ. प्रशान्त पडोळे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. गडचिरोली-चिमूर मतदारसंघ महायुतीचे अशोक नेते विरुद्ध महाविकास आघाडचे नामदेव किरसान अशी लढत झाली त्यात कांग्रेस उमेदवार किरसान निवडून येऊ शकते असा अंदाज आहे. दरम्यान पूर्व विदर्भातील या पाच लोकसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.

लोकसभा निकालात बुकिंचे भाव पाहून उमेदवार बुचकळ्यात?

ईव्हिएम मशीन मध्ये सगळ्यांचं उमेदवरांचं भविष्य दडलंय ते येणाऱ्या 4 जून ला दिसणारचं आहे. पण आयपीएल सट्टा चालविणारे बुकी आता लोकसभा निवडणूकीच्या सट्टा बाजारात पण सक्रिय झाल्याने पूर्व विदर्भातील 5 लोकसभा निवडणुकीत कोण उमेदवार निवडून येणार याचे गणित बुकी कडून घेण्यात येणाऱ्या सट्टा बाजारात ठरणार आहे, दरम्यान आयपीएल च्या क्रिकेट मैच होतांना अगोदरच सट्टा लावला जातो, त्यात कुठलाही अंदाज नसतो पण तो तर्क असतो की अमुक अमुक टीम जिंकू शकते, पण तरीही तर्काच्या भरोशावर आंधळ्यापणाने सट्टा लावला जातो, त्याचं धर्तीवर आता लोकसभा निवडणुकीत जय पराजय याचे गणित लावून सट्टा चालवला जात आहे, आता यामध्ये चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निवडणुकीत कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना बुकीनी पसंती दिली आहे तर नागपूर ला नितीन गडकरी यांना पसंती दिली आहे, उर्वरित रामटेक गडचिरोली गोंदिया भंडारा येथे महाविकास आघाडी ला पसंती आहे, त्यामुळे सट्टा बाजार जोशात आहे पण सट्टा बाजारात ठरलेल्या भावामुळे उमेदवरांचं यश अपयश अवलंबून नसतं जसं क्रिकेट मैच सुरु होण्यापूर्वी अंदाज बांधला जातो, पण तरीही जनतेच्या चर्च्यातून उमेदवार कोण निवडून येईल यांच्या अफवाच्या बाजारात बुकिंचे दर ठरले जात असल्याने कोट्यावधी रुपयांचा सट्टा खेळला जात आहे. दरम्यान बुकिंचे भाव बघून उमेदवार बुचकळ्यात पडले असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here