Home चंद्रपूर लक्षवेध :- चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेतुन कोण निवडून जाणार?

लक्षवेध :- चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेतुन कोण निवडून जाणार?

कुणाची हवा? काय आहे ग्राउंड रिपोर्ट? जातीय समीकरणे कशी बदलली? कोण मारणार बाजी.

चंद्रपूर :-

यावर्षीची लोकसभा निवडणूक ही मोदी विरोधी लाट असल्याने कांग्रेस महाविकास आघाडीकरिता मोठ्या फायद्याची ठरणारी आहे, कारण महागाई भ्रष्टाचार यामुळे सर्वासामान्य जनता चिडून आहे तर शेतकऱ्यांच्या शेत पिकांना मिळत नसलेला हमीभाव यामुळे शेतकरी राजा पण संतापून आहे, त्यामुळे कांग्रेस महाविकास आघाडी च्या उमेदवाराला मोठा फायदा होतांना दिसत आहे, दरम्यान चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निवडणूकीचा विचार केला तर इथे सुरुवातीला कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर राहणार अशी स्थिती होती, पण भाजप व त्यांच्या मित्र पक्षाच्या नेते कार्यकर्ते यांनी केलेल्या शिस्तबद्ध प्रचारामुळे कांग्रेस उमेदवार यांच्या तुलनेत भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचारात आघाडी घेतली होती, अनेक शहरात मिरवनुका व प्रचार सभा यामुळे भाजप उमेदवार मुनगंटीवार यांची सरसी झाली, मात्र जनतेच्या मनात मोदी सरकार विरोधात असलेला असंतोस हा मतदानाच्या माध्यमातून समोर आलाच त्यामुळे काही ठिकाणी कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना मोठी आघाडी मिळाली असल्याची चर्चा आहे तर काही ठिकाणी भाजप एकतर्फी मतदान घेत असल्याच्या चर्चा पण जोरात आहे, अशातच बाजी कोण मारणार? याविषयी प्रत्येक राजकीय विश्लेषकांचे त्यांचे त्यांचे गणित समोर येत आहे.

खरं तर सुरुवातीला धनोजे कुणबी फॅक्टर हा महत्वाचा ठरणार आणि कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर ह्या निवडून येणार अशी शक्यता वर्तवली जातं होती, परंतु राजकीय विश्लेषण असे होते की जर धनोजे कुणबी कांग्रेस कडे जाणार तर इतर खैरे कुणबी, तिरळे कुणबी, झाडे कुणबी, खेडुले कुणबी व मराठा कुणबी हे भाजप कडे जाणार आणि याची संख्या मोजली तर ती धनोजे कुणबी यांच्यापेक्षा जास्त आहे, अर्थात भाजपा कडे सुद्धा धनोजे कुणबी नेते यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून धनोजे कुणबी हे भाजप कडे सुद्धा वळले असेलच, कुणबी फॅक्टर हा काही ठिकाणी कांग्रेस साठी निर्णायक ठरला जरी असला तरी काही ठिकाणी भाजपसाठी सुद्धा फायद्याचा ठरला आहे, त्यामुळे केवळ कुणबी फॅक्टर महत्वाचा घटक नाही तर उमेदवार कोण आहे व त्याची कामगिरी काय आहे यावर काही मतदान झाले तर काही ठिकाणी मोदी नको म्हणून पंजाला मतदान झाले हे कुणीही नाकारू शकत नाही, या लोकसभेत अनुसूचित जाती नवबौद्ध आणि मुस्लिम मतदान निर्णायक आहे, मात्र काही कैडर मतदान हे वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला गेल्याने गठ्ठा मतदान कांग्रेस उमेदवाराला मिळेल याची शक्यता नाही, त्यामुळे भाजप विरोधात वातावरण असले तरी नियोजनात कांग्रेस उमेदवार मागे पडले असल्याने कांग्रेसला सहानुभूती मिळाली असतांना सुद्धा काट्याची टक्कर असलेल्या या लोकसभेत भाजप उमेदवाराचे चे पारडे थोडे जड असल्याची माहिती पुढे येत आहे.

काय विधानसभा निहाय मतदारांचा कौल?

मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार हंसराज अहिर यांना राजुरा विधानसभा क्षेत्रात 73880, चंद्रपूर 78187, बल्लारापूर 65480, वरोरा 76167, वणी 92366 आर्णी 126648 पोस्टल 2016 असे एकूण 5,14,744 मतदान मिळाले होते, तर कांग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांना राजुरा 109132, चंद्रपूर 103931, बल्लारपूर 96541, वरोरा 88627, वणी 90367, आर्णी 68952, पोस्टल 1957 असे एकूण 5,59,507 मते मिळाली होती व जवळपास 44 हजार पेक्षा जास्त मतांनी कांग्रेस चे बाळू धानोरकर निवडून आले होते, खरं तर त्यावेळी हंसराज अहिर नको म्हणून भाजप पक्षाचे काही कुणबी नेते पण कांग्रेस च्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी रणणिती करत होते व सगळा कुणबी एकत्र आला होता शिवाय दलित आणि मुस्लिम यांची गठ्ठा मते पण कांग्रेस उमेदवाराला मिळाली होती, पण यावेळी मात्र राजकीय परिस्थिती वेगळी आहे, यावेळी मोदी विरोधात लॉट होती व कांग्रेसच्या बाजूने जनतेचा कल होता, परंतु कांग्रेस उमेदवाराकडे कुठलीही प्लॅनींग नव्हती किंवा तसें कुठलेही नियोजन नव्हते, शिवाय कांग्रेस आघाडी सोबत जुळलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंव्हा आरापिआय गटाचे नेते कार्यकर्ते असेल त्यांना सोबत घेऊन कामाला लावले नाही तर केवळ भावनिक मुद्दे समोर आणून मतदारात माहोल करण्यात आला खरा पण ग्राउंड लेव्हलवर परिस्थिती फार वेगळी होती ती कांग्रेस उमेदवाराला कळली नाही त्यामुळे भाजप उमेदवार यांचे सुष्म नियोजन आणि कार्यकर्ते यांच्या माध्यमातून गावापातळी पर्यंत पोहचलेली प्रचार यंत्रणा यामुळे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचारात आघाडी घेऊन सर्वच विधानसभा क्षेत्रात पकड मजबूत केली.

यावेळी राजुरा बिधनसभा क्षेत्रात परिस्थिती कांग्रेसला अनुकूल असली तरी भाजप ला त्यात बरोबरी साधता आली आहे, राजुरा शहर, गडचांदूर शहर व गोंडपिपरी शहर इथे कांग्रेस आघाडी घेतांना दिसत आहे तर ग्रामीण मध्ये जीवती असेल किंवा राजुरा कोरपणा व गोंडपिपरी असेल ग्रामीण भागात भाजप उमेदवार आघाडीवर आहे, त्यामुळे राजुरा विधानसभा क्षेत्रात कांग्रेस ला मोठी आघाडी मिळण्याची शक्यता होती त्यावर विरजण पडले आहे व केवळ पाच ते सात हजाराची कांग्रेस ला बढत मिळू शकते,

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात शेवटच्या क्षणी आमदार किशोर जोरगेवार भाजप च्या प्रचारात आल्याने व भाजप चे माजी आमदार नाना शामकुळे यांचा बरोबर वापर झाल्याने चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेस ला भाजप ने बरोबरीत रोखले आहे,

बल्लारापूर विधानसभा क्षेत्र हे सुधीर मुनगंटीवार यांचे क्षेत्र असल्याने तिथे कुठल्याही स्थितीत स्थानिक राजकारणाच्या समीकरणात ते किमान 10 हजार ची बढत घेण्याची शक्यता आहे, कारण कांग्रेस चे दलित मते हे वंचित बहुजन आघाडीला जास्त गेल्याने कांग्रेस इथे मागे पडली आहे

वरोरा विधानसभा क्षेत्राचा विचार केला तर इथे कुणबी फॅक्टर चालला असे बोलल्या जाते ते पूर्णतः खरे नाही तर इथे स्थानिक आमदार म्हणून प्रतिभा धानोरकर यांचा पक्षांर्गत विरोध असल्याने इथे कांग्रेस उमेदवार किमान 15 ते 20 हजार मतांनी मागे आहे, तर भाजप उमेदवार यांच्या प्रचार सभा व मनसेची साथ यामुळे इथे भाजप आघाडीवर आहे.

वणी विधानसभा क्षेत्राचा विचार केला तर मागील वेळीच्या तुलनेत कांग्रेस चांगली बढत मिळवेल असे वाटतं होते व सुरुवातीला तसें चित्र पण दिसत होते परंतु या विधानसभा क्षेत्रात मनसेचे राजू उंबरकर यांची साथ असल्याने इथे सुद्धा भाजपा उमेदवार हा किमान 15 हजाराची आघाडी घेऊ शकतो असे चित्र दिसत आहे,

शेवटचा विधानसभा मतदार संघ म्हणजे आर्णी जिथे भाजप उमेदवार हंसराज अहिर यांनी मागील लोकसभा निवडणुकीत 55 हजार पेक्षा जास्त मतांनी कांग्रेस ला मागे टाकले होते, पण यावेळी तेवढी बढत भाजप घेऊ शकणार नाही मोदी विरोधात असलेला मतदारांचा कौल यामुळे भाजपला नुकसान होऊन केवळ 20 हजार मतांची बढत मिळेल असा अंदाज आहे,

वरील सर्व विधानसभा निहाय मतांच आकलन केलं तर राजुरा वगळता पाचही विधानसभा क्षेत्रात भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, पण ती आघाडी जास्त नसल्याने काट्याची टक्कर होणार आहे, जय पराजय याचं अंतर आता फार कमी झालं असून मागील लोकसभेच्या तुलनेत कांग्रेस ला बढत मिळत नसल्याचा अंदाज आहे तर भाजप उमेदवार किमान 20 ते 35 हजार मतांच्या मतधिक्यानी निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय होतं भाजप उमेदवार मुनगंटीवार यांचं प्लॅनींग?

चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निवडणुकीत सुरुवातीला कांग्रेस ला मोठी आघाडी मिळताना दिसत होती व सर्वत्र चर्चा होती की भाजप ने सुधीर मुनगंटीवार यांना बळीचा बकरा बनवला आहे वैगैरे वैगैरे, पण राजकारणात प्रदीर्घ अनुभव व सत्तापक्ष या सोबतच विरोधकांच्या तंबूत उठाठेव करणारे मोहरे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे असल्याने त्यांनी एक सुष्म नियोजन करून कांग्रेस च्या हवेला हवेतच ठेवण्याची रनणिती बनवली होती, कधी कधी विरोधकांना व भाजप च्या काही लोकांना वाटतं होतं की सुधीर मुनगंटीवार यांनी हार मानली आहे, कारण ते आकस्मिक गायब झाल्यासारखे होते व विरोधाकात चर्चेला उधान आलं होतं, दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी हार मानली नव्हती तर जसं वाघाला शिकार करण्यासाठी दोन पाऊल मागे यावं लागतं तसं त्यांचं प्लॅनींग पडद्यामागे सुरु होतं, त्यांनी ऑनलाईन मिटिंगच्या माध्यमातून पत्रकार, इंजिनिअर, कंत्राटदार अनेक संघटनाचे पदाधिकारी भाजप पदाधिकारी यांच्याशी सवांद साधून रनणिती आखली, कोण कुठे किती प्रभावी ठरणार याचं नियोजन करून भेटी घेतल्या, अगोदर इतर पक्षाच्या प्रभावी नेत्यांना हेरलं त्यांचे पक्ष प्रवेश घेतले आणि नंतर नाराज असलेल्या मित्र पक्षाच्या नेत्यांशी सवांद साधून नाराजी दूर केली, त्यांनी वणी आर्णी या विधानसभा क्षेत्रात विशेष लक्ष दिलं व विरोधकांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेऊन विरोधकांच्या रनणितीवर त्यांनी मात केली, खरं तर यावेळी कांग्रेस ला मोठा पाठिम्बा मिळत असतांना व्यक्तिगत विकास कामे व जनतेसमोर नतमस्तक असणारी त्यांची वक्तव्य यामुळे कांग्रेस उमेदवार यांच्यावर ते भारी पडले, दरम्यान त्यांच्या 1984 च्या शीख दंगलीच्या संदर्भातील वक्तव्यांनी वादळ उठलं होतं पण त्यावर सुद्धा शेवटच्या क्षणी त्यांनी मात केली आणि त्यामुळेच त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे त्यांनी हारलेली बाजी पलटवून शेवटच्या क्षणी मतदारांनी भरभरून मते दिली असल्याची शक्यता वरील विधानसभा निहाय जनतेच्या कौल वरून दिसत आहे

Previous articleचंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभेतील कोणत्या लोकसभा मतदारसंघात किती टक्के झाले मतदान,
Next articleसनसनीखेज:- विदर्भातील पाच लोकसभा निवडणूकीचे निकाल धक्कादायक लागणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here