Home चंद्रपूर क्राईम न्यूज :- विदर्भातील अनेक जिल्ह्यात सोने चोरी करणाऱ्या अट्टल चोराला चंद्रपूर...

क्राईम न्यूज :- विदर्भातील अनेक जिल्ह्यात सोने चोरी करणाऱ्या अट्टल चोराला चंद्रपूर पोलीसांनी केली अटक

 

रामनगर व चंद्रपुर शहर पो.स्टे. यांची संयुक्त कार्यवाही, विर्दभातील आरोपींचे ब्रेक द चेन आटोक्यात.

क्राईम न्यूज :-

चंद्रपूर येथील रामनगर व शहर पोलीस स्टेशन च्या संयुक्त कारवाईत दिनांक ०५/०५/२०२१ रोजी शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुधाकर अंबोरे पोलीस यांचे मार्गदर्शनात सपोनि एकरे, पोउपनि वाघमारे डी बी पथकातील कर्मचारी यांनी शिताफीने कामठी जि. नागपुर येथील आरोपी नामे जिशान उर्फ जिशु सयद रिजवान रिझवी वय २० वर्ष रा. झेंडा चौक, बकरा कमेला जवळ, कामठी नागपुर यास चंद्रपूर शहरातील अनेक भागात चोरी केलेल्या व गुन्हे दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.

सादर आरोपी विरोधात पोलीस स्टेशन, रामनगर अप क. १२५/२०२१ कलम ३९२ भादवि अन्वये गुन्हयात अटक करून त्याचे कडुन सदरचा गुन्ह्यासोबतच पोलीस स्टेशन, रामनगर येथील अपक ६७/२०२१, ३७७/२०२१ तसेच चंद्रपुर शहर अप क. ७३/२०२१, ४८/ २०२१ असे. असे एकूण ५ गुन्हे उघडकिस आणून त्यांचे कडुन ५ नग सोन्याचे चैन किमत ४.३६,७७१/- रु.चा माल हस्तगत करण्यात आला आहे.असे एकुन ८ पेक्षा जास्त गुन्हे रामनगर व चंद्रपुर शहर पो.स्टेतील डी.बी. पथकाने उघडकीस आणले आहेत. सदर आरोपी चा साथीदार शाहीद अली रज्जा अली, रा. कामठी नागपुर या दोघांनी मिळुन होन्डा शाईन मोटार सायकलनी चंद्रपूर शहरात तसेच वर्धा, अमरावती, भंडार, नागपुर येथे गुन्हे केले असून आरोपी शाहीद अटक करणे बाकी असून त्यास गुन्हयात अटक करून त्यांचे भरपूर प्रमानात राज्यातील व इतर राज्यातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अरविंद साळवे सा चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे सा. मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. नांदेडकर सा. यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोनि रोशन आर यादव, पो. नि. फुदयनारायन यादव, सपोनि अकरे, सपोनि मलीक, पोउपनि वाघमारे पो हवा. रजनीकांत पुठ्ठावार, पो. ह. गजानन डोईफोडे ,पोहवा / प्रशांत शेंदरे, नापोशि/ पुरुषोत्तम चिकाटे, ना.पो.शी. संजय चौधरी, नापोशि / ११७६ किशारे वैरागडे, नापोशि/ ०९ पेतरस सिडाम, पो.शी./ २५१३ विकास जुमनाके, पो.शी./ ५३२ सतिष अवथरे, पो. शी. / २४३० लालु यादव, पोशि/८२५ हिरालाल म.पो.शी./ २३२४ भावना रामटेके यांनी केली आहे.

Previous articleदुःखद :- आंबेडकरी चळवळीचा योद्धा प्रा.मुकुंद खैरे यांचे कोरोना ने दुःखद निधन.
Next articleमदतकार्य :- सीडीसीसी बैँकेच्या शेतकरी कल्याण निधी अंतर्गत मृतकाच्या पत्नीस मदतीचा हात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here