Home चंद्रपूर धक्कादायक :- एसआयटी चौकशी सुरु असतांना देखील जिल्ह्यात मद्य विक्रेत्या कडून राज्य...

धक्कादायक :- एसआयटी चौकशी सुरु असतांना देखील जिल्ह्यात मद्य विक्रेत्या कडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची अवैध वसुली?

एकीकडे बिअर बार, बिअर शॉपी व वाईन शॉपी चे परवाने दिल्या प्रकरणी एसआयटी चौकशी सुरु असताना दुसरीकडे अवैध वसुलीचे ऑडिओ व्हायरलं?

चंद्रपूर:-

भ्रष्टाचाराच्या सगळ्यां सीमारेखा तोडून आपल्या कर्तव्यावर तुळशीपत्र सोडणारे व कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तत्कालीन अधीक्षक संजय पाटील यांच्या आदेशाने काम करणाऱ्या कार्यालयीम अधीक्षक व निरीक्षक यांना चंद्रपूर च्या एसीबी ने एका बिअर शॉपी दुकानंदारांनाकडून 1 लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडल्या नंतर संजय पाटील यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले होते, दरम्यान जिल्ह्यातील शेकडो दारू दुकानानां सगळे नियम धाब्यावर बसवून मंजुरी देतांना कोट्यावधी रुपयाची लाच घेतल्या प्रकरणी संजय पाटील व तत्कालीन निरीक्षक यांची एआयटी चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी शासनाकडे केली, तोच धागा पकडून तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा विधानासभेत हा मुद्दा लावून धरला व शासनाला बेकायदेशीर दारूचे लायसन्स वाटणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची व त्यांनी दिलेल्या बेकायदेशीर लायसन्स ची एसआयटी चौकशी करण्यास शासनास भाग पाडले, दरम्यान चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक व लालुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच 7 व 8 एप्रिल ला टीम येऊन जिल्ह्यातील बेकायदेशीर व नियम डावलून मद्य परवाने दिल्या प्रकरणी जनतेच्या तक्रारी जाणून घेतल्या व तसें लेखी बयान नोंदवून घेतले असतांना आता त्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या मद्य परवाने धारकांकडून अवैध हप्ता वसुलीच्या ऑडिओ व्हायरलं होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहें.

चंद्रपूर जिल्ह्यात कित्तेक मद्य परवाने देताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी कुठलेही निकष न पाळता केवळ एका एका परवान्यासाठी 5 ते 10 लाख रुपये लाच घेतली व बेकायदेशीर मद्य परवाने वाटप केले त्या विरोधात कित्तेक जागृत नागरिकांनी लालुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण यांच्याकडे तक्रारी केल्या, त्या तक्रारी च्या अनुषंगाने आता चौकशी होऊन परवाने रद्द होण्याची स्थिती निर्माण झाल्याने मद्य परवाने धारक चिंतेत आहें तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ते दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहें असे असतांना पुन्हा त्या मद्य परवाने धारकांकडून हप्ता वसुली सुरु असेल तर मग या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मुजोरी किती म्हणायची? हा संतापजनक प्रश्न उभा ठाकला असून ऑडिओ रेकॉर्डिंग अधिकारी कर्मचारी यांची नावे समोर आली आहें.

कोण आहेत हप्ता वसुली करणारे?

राज्य उत्पादन शुल्क विभागाची तशी तीन कार्यालये जिल्ह्यात असून मुख्य कार्यालय चंद्रपूर ला आहें तर जिल्ह्याची अर्धी जबाबदारी सांभाळणारे वरोरा येथे कार्यालय आहें, राजुरा येथे जगदीश कापटे यांच्याकडे हप्ता वसुली ची जबाबदारी देण्यात आली असून ते स्वतः बिअर बार मध्ये दारू पितांनाचा व्हिडीओ व्हायरलं झाला आहें, जिल्ह्यात भरारी पथकाचे सर्व्हेसर्वा असणारे ईश्वर वाघ हे आपल्या हप्ता वसुली ची गैग घेऊन त्यांच्या खाजगी वसुली एजंट पंढरी चौधरी मार्फत हप्ता वसुली चा ऑडिओ व्हायरलं झाला आहें, त्यांचे भरारी पथक जिल्ह्यातील सर्व अवैध दारू विक्रेत्याकडून हप्ता वसुली करून त्यांच्या अवैध मद्य विक्रीला चालना देतं आहें.

वरोरा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक थोरात यांनी तर जिल्ह्यात अवैध मद्य विक्रेते यांच्याकडूचं हप्ता वसुलीचे काम सांभाळले नाही तर वरोरा भद्रावती सह चिमूर ब्रम्हपुरी, नागभीड सिंदेवाही सावली मूल दुर्गापूर इथपर्यंत ज्यांची मद्य परवाने आहेत त्यांच्याकडून पाच ते दहा हजार हप्ता वसुली चा गोरखधंदा चालवला आहें, कुठे कुठे तर ते स्वतः वसुलीला जातात तर त्यांचा कर्मचारी जगदीश मैस्के व खाजगी एजंट शेलार अवैध वसुली करताहेत अशी ऑडिओ व्हायरलं झाली आहें.

हे आहेत एआयटी चौकशी च्या घेऱ्यात.

अगोदरचं नियमबाह्य मद्य परवाने दिल्या प्रकरणी तत्कालीन निलंबित अधीक्षक संजय पाटील यांच्यासह निरीक्षक पवार व थोरात यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता असतांना व जिल्ह्यातील अनेक मद्य परवाने रद्द होण्याची भीती व्यक्त होत असतांना जर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी हप्ता वसुली चा खेळ खेळत असतांना त्या खेळाचा ऑडिओ व्हिडीओ व्हायरलं होत असेल तर ह्या अधिकारी कर्मचारी यांना निलंबित नाही तर कायमचे नोकरी मधून बंडतर्फ करायला हवं आणि त्यांच्या संपत्ती जप्त करायला हवी तरच यांच्या हप्ता वसुलीवर प्रतिबंध लागेल, दरम्यान आता एसआयटी चौकशीच्या घेऱ्यात विद्यमान अधीक्षक व भरारी पथकाचे प्रमुख ईश्वर वाघ पण येणार आहें व त्यामुळे आणखी काही सनसनीखेज खुलासे समोर येणार आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here