शिक्षक शिक्षकेत्तर बोगस नोकर भरतीत चंद्रपूरातील तथाकथित शिक्षण महर्षी सह मूल सावलीतील संस्थेचा सहभाग?
निलंबित शिक्षणाधिकारी कल्पना चौहान व शिक्षण उपसंचालक उल्हास नरड च्या संगनमताने बोगस शिक्षक शिक्षकेत्तर भरती.
चंद्रपूर :-
नागपूर विभागात शिक्षक आणि शिक्षकेतर भरती घोटाळा समोर आल्यानंतर नागपूर शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह काही जणांना पोलिसांनी अटक केली होती, दरम्यान शिक्षक भरतीवर बंदी असतानाही बनावट कागदपत्राद्वारे बोगस नियुक्त्या देण्यात आल्या होत्या ही बाब चौकशीतून समोर आल्यानंतर अनेकांना पोलिसांनी अटक केली, दरम्यान नागपूर नंतर आता चंद्रपूर मध्ये सुद्धा या बोगस शिक्षक शिक्षकेत्तर भरतीचे सूर ऐकायला येऊ लागले असून एका तथाकथित शिक्षण महर्षी ने तत्कालीन शिक्षणाधिकारी कल्पना चौहान व शिक्षण उसंचालक उल्हास नरड यांच्या माध्यमातून तब्बल 50 शिक्षक व शिक्षकेत्तर नोकर भरती केल्याची खळबजनक माहिती समोर आली आहें, तर दुसरीकडे सावली आणि मुल तालुक्यात काही शिक्षण संस्थांमध्ये बोगस भरती झाल्याचा आरोप सिद्धार्थ रामटेके यांनी केला असल्याने नागपूर नंतर चंद्रपुरातील शिक्षण संस्थात शिक्षक शिक्षकेत्तर नोकर भरतीचा मोठा घोटाळा समोर येण्याचे संकेत मिळत आहें. दरम्यान लवकरच त्या तथाकथित शिक्षण महर्षी सह इतर संस्थांच्या संचालकांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनतर्फे आक्रमकपणे शिक्षण विभागाविरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती आहें.
सावली आणि मुल तालुक्यात काही शिक्षण संस्थांमध्ये बोगस भरती झाल्याचा आरोप सिद्धार्थ रामटेके यांनी केला आहे. याविषयी रामटेके यांनी नागपूर विभागीय शिक्षण कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद शाळेच्या मुख्याध्यापकांनी वर्तमान पत्रातून परस्पर पदभरतीची जाहिरात देऊन बेकादेशीर भरती केल्याचे आरोप करण्यात आले आहे. याची तक्रार माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आली होती. परंतू, तत्कालीन शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्याशी संगणमत करून संस्थेचा वाद न्यायप्रविष्ठ असताना सुद्धा प्रत्येकी 25 लाख रुपये घेऊन 5 शिक्षकांची बोगस भरती करण्यात आली. आणि त्यांना शालार्थ ID देऊन शासनाची फसवणूक केली, त्यामुळे ही पदभारती रद्द करण्याची मागणी रामटेके यांनी केली आहें.
तथाकथित शिक्षण महर्षी ने शासनाला लावला कोट्यावधीचा चुना?
नागपूरच्या काही बोगस शालार्थ आयडी प्रकरणी शिक्षण विभागातील काही अधिकारी आणि संस्थाचालकांवर कारवाई सुरू असतानाच आता चंद्रपुरातही शिक्षक शिक्षकेत्तर नोकर भरती घोटाळा झाल्याची पुष्टी मिळत असून चंद्रपूरातील तथाकथित शिक्षणमहर्षीने आपल्या संस्थेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून माध्यमिक शिक्षक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाची भरती न करता शासन निर्णयातील कार्यपद्धतीचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून जवळपास ५० शिक्षकांच्या बोगस आणि नियमबाह्य नियुक्त्या करून शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार दिसत आहें, दरम्यान राज्य सरकारने बोगस शिक्षक भरतीचे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, कारवाई सुद्धा केली जात आहे. मात्र आपण या जाळ्यात अडकू या भीतीने हा तथाकथित शिक्षणमहर्षी कारवाईच्या भितीने माजी शिक्षक आमदार नागोराव गाणार यांच्याकडे मदतीसाठी मनधरणी व याचना करीत असल्याचे विशेष सूत्रांकडून समोर येत आहें.
तत्कालीन शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई.
चंद्रपूरच्या माध्यमिक शिक्षण विभागात कल्पना चव्हाण तीन वर्षांपूर्वी कार्यरत असतांना त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील अनेक कार्यरत – सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवली जात होती. या संदर्भात शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आयुक्त (शिक्षण) पूणे यांच्याकडे केली होती.
त्यांच्या तक्रारीवर शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या तपासणी पथकाने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाची केलेल्या तपासणीत वरिष्ठ निवड श्रेणी, वैद्यकीय प्रकरणे, सेवानिवृत्ती प्रकरणे व इतर अनेक प्रकरणे प्रलंबित ठेवणे, त्यांचे कार्यालयीन कामकाजावर व अधिनस्त कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसणे, कामकाजात दप्तर दिरंगाई करणे, लोकसेवा हमी कायद्यांतर्गत चुकीचा अहवाल सादर करणे, आदी बाबी चौकशीत आढळून आल्या. त्यामुळे श्रीमती चव्हाण यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 च्या नियम 10 अन्वये आयुक्त (शिक्षण) पुणे यांनी दोषी ठरविले आणि निलंबित केले.