शेकडो कामगारांनी मनसेच्या मेळाव्यात घेतला सहभाग, इंजि दिलीप झाडे व विधी विभागाचे वकिलांचे विशेष मार्गदर्शन.
चंद्रपूर :-
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात अनेक उद्योगात कामगारांना एकत्र करून त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची शाखा उभारल्या जात असून कामगारावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्याचा आम जोमात सुरु आहें, त्यामुळे अनेक उद्योगातील कामगार आता मनसेत सामील होत आहें, दरम्यान आज महाराष्ट्र दिनी व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून स्थानिक वरोरा नाका येथे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात दुपारी 1.30 वाजता भव्य कामगार मेळाळा संपन्न झाला,
या मेळाव्याला स्कॉलर सर्च फाउंडेशन चे अध्यक्ष तथा यशस्वी उद्योजक इंजि दिलीप झाडे व विधी विभागाचे अँड अविनाश
खरडकर यांनी विशेष मार्गदर्शन केले, या कामगार मेळाव्याचे आयोजन करणारे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी येणाऱ्या काळात जिल्ह्यातील सर्व कंपन्यात महाराष्ट्र, नवनिर्माण कामगार सेनेच्या कामगार शाखा असेल व मनसेची ताकत वाढवून सर्व निवडनुका मध्ये पक्षाचे उमेदवार निवडून आणू असे आश्वासन दिले, यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, उमाशंकर तिवारी, जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, अँड अजित पांडे इत्यादीनी आपले मनोगत व्यक्त केले, या कामगार मेळाव्याला जिल्ह्यातील अनेक उद्योगातील कामगारांनी सहभाग घेतला, यावेळी उपस्थित कामगारांना स्वरूची भोजन देण्यात आले.