Home भद्रावती लेडी सिंघम आयपीएस नियोमी साटम यांच्या धडक कार्यवाहीने अवैध व्यवसाईकांचे धाबे दणाणले.

लेडी सिंघम आयपीएस नियोमी साटम यांच्या धडक कार्यवाहीने अवैध व्यवसाईकांचे धाबे दणाणले.

वर्धा नदी राळेगाव रेती घाटावर रात्री 12 वाजता धडक कार्यवाहीत एक बोट सहित 30 लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त.

भद्रावती प्रतिनिधी :-

“मनात आणलं तर काय होऊ शकत नाही?” असं म्हटल्या जातं पण त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि देशहित आपल्या डोळ्यासमोर असेल तर ते कार्य आदर्श आणि प्रशंसनीय असतें, वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर आयपीएस नियोमी साटम ह्या रुजू झाल्यापासून वरोरा भद्रावती तालुक्यातील अवैध व्यवसाईकांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान भद्रावती तालुक्यातील वर्धा नदी राकेगांव रेती घाटावर रात्री 12 वाजता त्यांनी धडक कार्यवाही करून एक बोट सहित 30.70 लाखाचा मुद्देमाल जप्त करून कलम ३७९, ४३०,४३१, १०९, १२० (ब),१८८, भादवि सह कलम ४८ (७) (८) महा. जमिन. महसुल. अधिनियम १९६६ अन्वये पोस्टे माजरी येथे तब्बल 6 लोकांवर गुन्हा नोंद केला असल्याने पहिल्या पोस्टिंग मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या दबंग आयपीएस नियोमी साटम ह्या लेडी सिंगम म्हणून पुढे आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केल्या जातं आहे. त्यांच्या सुरु कार्यकाळात त्यानी अवैध रेती, अवैध तंबाखू विक्री, अवैध दारू व जनावरांची वाहतूक यावर प्रतिबंध लावण्यासाठी कारवाई करण्याचा धडाका लावला आहे

माजरी परिसरातील भुरखी रेती घाटावर बोटीने रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा करून त्याची वाहतूक केली जातं असल्याची गोपनीय माहिती आयपीएस नियोमी साटम यांना मिळाली असता त्यांनी दिनांक 21/02/2024 रोजी रात्रौ.11/00 वाजता च्या दरम्यान गोपनिय माहितीवरुन माजरी ठाणेदार सपोनि.योगेश खरसान सोबत पोउपनि. भोजराम लांजेवार ,सफौ.बंडु मोहुर्ले,पोलीस अंमलदार गुरु शिंदे व गजानंद पोले यांच्या टिमने मौजा राळेगाव रिठ येथील वर्धा नदी घाट येथे रेड केली असता वर्धा नदी राळेगाव रेती घाटातून होडी (बोट) मध्ये रेतीचा उपसा करण्याकरीता डिझल इंजिन लाऊन जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे आदेशांचे उल्लंघन करुन चंद्रपूर जिल्ह्याचे हद्दीतून यवतमाळ जिल्ह्याचे हद्दीमध्ये वर्धा नदीचे पात्रात जमा करुन हायवा ट्रकने अवैद्यरित्या रेतीची तस्करी चालू असतांना आढळून आल्याने वापरन्यात आलेले पोकलँन मशीन, टिनाचे पत्र्याची होडी (बोट) ,डिझल ईंजिन व लोखंडी पाईप असा एकून ३०,७०,०००/- रुपयाचा मुद्देमाल माजरी पोलीसांनी जप्त केला.

स्वत:चे आर्थित फायद्यासाठी, कट रचुन चोरटया पद्धतीने मोठया प्रमाणात रेती मिळविण्यासाठी जाणिव पूर्वक रेतीचे अवैद्य उत्खनन करुन चोरी करीत असल्याचे तसेच वर्धा नदीचे पात्रातील रेतीची आगळीक केल्याने व नदीचे पिण्यायोग्य पाणी दुषित करन्यास कारणीभुत झाले तसेच गैरपणे पाण्याचे दिशेत बदल करुन होडीचा (बोट) वापरुन रेतीचे अवैध उत्खनन केले. शेतीमध्ये व पिण्याच्या पाण्यामध्ये घट होईल याची जाणीव असतांनासुद्धा नदीच्या पाण्याचे निचरा प्रक्रियेस क्षती पोहचविली या करणावरून आरोपी -1)शेख शेहजाद शेख निशाद रा. यवतमाळ, 2)आरीफ अहेमद सिद्दीकी अहेमद रा. यवतमाळ 3) सैय्यद कादर सैय्यद दाऊद रा. यवतमाळ व 4)श्री सैय्यद मन्सूर सैय्यद दाऊद रा.यवतमाळ व इतर ईसमा विरुद्ध दि.22/02/2024 रोजी अप क्र. 19 /2024 कलम ३७९, ४३०,४३१, १०९, १२० (ब),१८८, भादवि सह कलम ४८ (७) (८) महा. जमिन. महसुल. अधिनियम १९६६ अन्वये पोस्टे माजरी येथे गुन्हा नोंद करन्यात आला.गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलिस अधिक्षक चंद्रपूर व मा. एस.डी.पी.ओ.वरोरा यांचे मार्गदर्शनात माजरी ठाणेदार श्री. योगेश खरसान करित आहे.

Previous articleखळबळजनक :- शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा संघटिका योगिता लांडगे यांचा पक्षाला जय महाराष्ट्र.
Next articleचंद्रपूर मनपातील भ्रष्टाचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here