Home चंद्रपूर खळबळजनक :- शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा संघटिका योगिता लांडगे यांचा पक्षाला जय...

खळबळजनक :- शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा संघटिका योगिता लांडगे यांचा पक्षाला जय महाराष्ट्र.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देऊन जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या होतं असलेल्या नियुक्त्या व पक्षात चाललेली एकाधिकारशाहीला कंटाळून राजीनामा.

वरोरा प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला सामाजिक चळवळीत अग्रेसर असणाऱ्या योगिता लांडगे यांचे नेतृत्व लाभले होते व त्यांच्या सामाजिक कार्यकातून जुळलेल्या हजारो महिलांचा गट त्यांच्याकडे असल्याने पक्षाला मजबुती मिळाली होती पण कधी इकडे, कधी तिकडे अशा फेऱ्या करणाऱ्या काही लोकांच्या हातात पक्षाची सूत्रे आल्याने व पक्षात जिल्हा संघटिका हे पद सर्वोच्य असतांना सुद्धा योगिता लांडगे यांना जाणीवपूर्व डावलले जातं असल्याने पक्षाचे नेतृत्व करण्यास सक्षम अशा योगिता लांडगे यांना शेवटी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आला आहे. दरम्यान पुरीगामी चळवळीत ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात प्रमुख चेहरा असणाऱ्या योगिता लांडगे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या चंद्रपूर शिवसेना महिला जिल्हा संघटिका पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षा डॉ. निलमताई गोन्हे यांच्याकड़े दिला आहे व या राजीनाम्याच्या प्रती एकनाथराव शिंदे, मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख. डॉ. मनिषा कायंदे, प्रदेश सचिव, शिवसना महिला आघाडी मुंबई व संजयजी मोरे, मा. प्रदेश सचिव, शिवसेना यांना पाठवलेला आहे. दरम्यान योगिता लांडगे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्याने शिंदे शिवसेना गटाला मोठा हादरा बसला असल्याचे बोलल्या जातं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये गेल्या दोन वर्षांपासून मुख्य संघटिका व महिला जिल्हाप्रमुख म्हणून लक्षनीय काम करणाऱ्या योगिता लांडगे यांना स्थानिक पदाधिकारी विश्वासात न घेता परस्पर कुणालाही पदे देत होते व केवळ वरवरच राजकारण करून पक्षाच्या पदाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करत होते मात्र पुरोगामी चळवळीतून पुढे आलेल्या योगिता लांडगे यांची कामगिरी ही पक्ष संघटनेला बळकठी निर्माण करणारी ठरत असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्या प्रमुख दावेदार असण्याची शक्यता लक्षात घेता त्यांना पुढे जाऊ द्यायचे नाही म्हणून अनेक प्रसंगात व पक्षाच्या कार्यक्रमात त्यांना डावलले जातं होते त्यामुळे हे त्यांना सहन झाले नाही व त्यांना ह्या प्रकारची वागणूक असह्य होत असल्याने  आणि हिंदुहृदयसम्राट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देऊन जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या होतं असलेल्या नियुक्त्या व पक्षात चाललेली एकाधिकारशाहीला कंटाळून .त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन शिंदे शिवसेना गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here