Home Breaking News चंद्रपूर मनपातील भ्रष्टाचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

चंद्रपूर मनपातील भ्रष्टाचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

महानगरपालिका झोन क्रमांक 1 मधील कर लिपिक फारुख शेख यांना 15 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

चंद्रपूर  :-  चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 23 फेब्रुवारीला चंद्रपूर मनपाच्या झोन क्रमांक 1 मधील कर लिपिक 52 वर्षीय फारुख अहमद मुस्ताक शेख यांना 15 हजारांची लाच स्वीकारताना अटक केली.

फिर्यादी यांनी स्वतः व मुलांच्या नावाने फ्लॅट घेतले होते, त्या मालमत्तेवर भोगवटदार यांचे नावे समाविष्ट करण्यासाठी मनपा झोन क्रमांक 1 मध्ये अर्ज दिला होता.

मात्र कर लिपिक फारुख शेख यांनी फिर्यादीला काम करून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागितली, फिर्यादी यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दिली.

23 फेब्रुवारीला तक्रारीची पडताळणी केल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत सापळा रचला, महानगरपालिका झोन क्रमांक 1 मध्ये 23 फेब्रुवारीला कर लिपिक फारुख शेख यांना 15 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.याबाबत सध्या पुढील तपास सुरू आहे,

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे व पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, कार्यालयीन स्टाफ रमेश दुपारे, अरुण हटवार, नरेश ननावरे, राज नेवारे, संदेश वाघमारे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे व सतीश सिडाम यांनी केली

फेब्रुवारी महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सलग 3 कारवाया केल्या, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आवाहन करीत कोणतेही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम काम करून देण्यासाठी पैसे मागत असेल तर त्याबाबत चंद्रपूर कार्यालय क्रमांक 07172-250251 वर सम्पर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleलेडी सिंघम आयपीएस नियोमी साटम यांच्या धडक कार्यवाहीने अवैध व्यवसाईकांचे धाबे दणाणले.
Next articleधक्कादायक :- महिला सशक्तीकरण अभियान या सरकारी कार्यक्रमात आमदार जोरगेवारची चमकोगिरी ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here