Home चंद्रपूर धक्कादायक :- महिला सशक्तीकरण अभियान या सरकारी कार्यक्रमात आमदार जोरगेवारची चमकोगिरी ?

धक्कादायक :- महिला सशक्तीकरण अभियान या सरकारी कार्यक्रमात आमदार जोरगेवारची चमकोगिरी ?

आयोजन महिला बाल विकास व महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे आणि श्रेय घेत आहे आमदार किशोर जोरगेवार?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

जिल्ह्यात महिलांचा सर्वांगिन विकास व्हावा व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून महिला बाल विकास व महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे संयुक्त विद्यमाने चांदा क्लब ग्राउंड मध्ये नवतेजस्विनी प्रदर्शन व विक्री यासह उदयोजक महिला व विशिष्ठ काम करणाऱ्या महिलांचा गौरव, महिलांकरिता पारंपारिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. खरं तर हा कार्यक्रम शासकीय असल्याने यामध्ये जिल्हाधिकारी हे प्रमुख व त्यानंतर लोकप्रतिनिधी यांचा सहभाग असायला हवा मात्र यामध्ये खुशिया लोकसंचालक साधन केंद्र या संस्थेला समोर करून आमदार किशोर जोरगेवार यांनी आपली यंग चांदा ब्रिगेड या कार्यक्रमात घुसवली व सरकारी कार्यक्रम हा खाजगी कार्यक्रम बनवून स्वतःची चमकोगिरी दाखवली. हे अत्यंत चुकीचं असून दुसऱ्याच्या नावावर असलेला कार्यक्रम स्वतःचा दाखवून असले उपदव्याप आमदार किशोर जोरागेवर यांनी चालवल्याने त्यांच्या या भूमिकेने सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात लोकप्रतिनिधी यांनी आपले कर्तव्य वेशीवर टाकून नको ते उपदव्याप सुरु केले आहे, जिथे जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रशासनासोबत लढण्याचे व त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याचे कर्तव्य त्यांनी बजवायला हवे तिथे ते सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवून सामाजिक सांस्कृतिक संस्थाच्या हक्काचे कार्य स्वतःकडे ठेवत आहे व मूळ कर्तव्याला फाटा देत आहे, हे सर्व करतांना त्यांना वाटत आहे की जनता यामुळे खुश होईल व आपली अनोखी खेळी यशस्वी होईल पण ते मुर्खाच्या नंदनवनात सैर करत आहे हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे, कारण जनतेने त्यांना विकास करायला व जनतेचे प्रश्न सोडवायला निवडून दिले, कार्यक्रमाचे आयोजन करून सरकारी पैशाचा उपयोग स्वतःची चमकोगिरी करायला नाही,

जिल्ह्यातील अनेक आमदार त्यांच्या आमदार निधीचा पैसा जनकल्याण कारण्यासाठी सोडून स्वतःच्या प्रसिद्धी करिता खर्च करतात हे माहीत आहे पण त्यापलीकडे जाऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी तर सरकारी कार्यक्रम स्वतःच्या नावाने खपवून स्वतःची चमकोगिरी चालवल्याचे विदारक व दुर्दैवी चित्र दिसत आहे, त्यांनी क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन जनतेची दिशाभूल तर चालवलेली आहेच शिवाय जनतेला दिलेला 200 वीज युनिट मोफत चा शब्द हा मोदींच्या त्या 15 लाख जुमल्याला पण लाजवेल अशी बेशरमपणे खेळी ते खेळत आहे हे सर्वात मोठं चंद्रपूरकरांच दुर्भाग्य म्हणावं लागेल की त्यांनी अशा व्यक्तीवर विश्वास ठेवला ज्यांनी जनतेला दिलेला शब्द तर पाळला नाहीच पण नसले उपदव्याप करून जनतेची दिशाभूल केली आहे. आता या संदर्भात जनतेत काय प्रतिक्रिया उमटते व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना जनता काय धडा शिकवते हे पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहे.

बचत गट महिलांची आर्थिक फसवणूक?

महिला व बाल विकास आणि महिला विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवतेजस्विनी प्रदर्शन व विक्री कार्यक्रमात ज्या बचत गटांच्या महिलांना आमंत्रित करण्यात आले त्या जिल्हाभरातून जवळपास 50 बचत गटांनी यामध्ये आपापल्या उद्योगाचे स्टॉल लावले, यामध्ये सहभाग घेतल्याने आपल्या समानाची मोठया प्रमाणात विक्री होऊन आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल असे त्यांना वाटले मात्र माविम च्या ढिसूळ नियोजनामुळे त्यांचे स्वप्नांवर विरजण पडले.अनेकांनी आपला स्टॉल बंद करुन व पर्यायी आपला माल फेकून आपला गाव बरा हेच पसंद केले आहे. मविआ च्या कार्यक्रमात बचत गटांना स्टाल लावण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्यासाठी प्रत्येक स्टाल साठी १०००/- रू. (एक हजार रूपये) बचत गटांनी स्टाल लावले, आज कार्यक्रमाची दिशा भटकल्यामुळे या प्रदर्शनी कार्यक्रमात गर्दी झाली नाही व नगण्य उपस्थिती असल्यामुळे बचतगटांनी रक्कम भरून लावलेल्या स्टाल कडे कुणीही भटकत नसल्यामुळे बचतगटांच्या महिलांमध्ये आमदारांच्या “चमकोगिरी” बद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत असून एक प्रकारे त्यांचे आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे बोलल्या जातं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here