कृषी अधिकारी कर्मचारी यांचा पुढाकार, गावातील लहान मुलांसह वयोवृद्ध रॅलीत सहभागी,
धनराज बाबरवे
(ता प्रतिनिधी टेमुर्डा):-
वरोरा तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने कृषी संजीवनी योजनेच्या प्रचारार्थ टेमुर्डा सर्कल मधील पिंपळगाव येथे मशाल रॅली चे आयोजन दिनांक २५/०४/२०२५ रोज शुक्रवारला करण्यात आले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही दोन टप्प्यात राबविण्यासाठी त्याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी जनजागृती करिता रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
पिंपळगाव येथे दिनांक २५/०४/२०२५ रोज शुक्रवारला मारोती मंदिरापासून सायंकाळी ७ वाजता नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या प्रचारार्थ मशाल फेरी काढण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन कूषी सहाय्यक देशमुख व या कार्यक्रमाचे मागदर्शन लोंखडे कूषी पर्यवेक्षक जोजार कूषी सहाय्यक व गावातील प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी व गावातील तरुण शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले. कृषी पर्यवेक्षक लोखंडे यांनी वातावरणातील झालेले बदल शेती आणि मानवी जीवनात झालेले परिणाम व या बदला प्रमाणे शेतामध्ये कशाप्रकारे पिके घेतली जातात व गटशेती कशी केल्या जाते त्याची माहिती देऊन शासकीय योजनाची सुद्धा माहिती दिली.