पात्र अपात्रतेच्या खेळात कुणाची कुटणिती चालणार, चौकशीत कोण अडकणार? हे आहेत नवीन खेळाडू?
चंद्रपूर:-
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या 360 पदाच्या नोकर भरतीत सगळे शासकीय नियम धाब्यावर बसवून व स्वतःच्या उपविधी मध्ये नमूद आरक्षणाला डावलून जी सिडीसीसी बैंकेची नोकर भरती झाली त्याची चौकशी आता सुरु असून येत्या 7 मे ला मनसे जिल्हा उपाध्यक्ष तथा आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे समन्वयक राजू कुकडे व भाजप ओबीसी आघाडी चे शहर जिल्हाध्यक्ष मनोज पोतराजे यांच्यासह जवळपास 9 लोकांना चौकशी समितीसमोर आपले मत मांडण्यासाठी व त्या संदर्भात पुरावे सादर करण्यासाठी बोलाविण्यात आले आहें, त्यामुळे विद्यमान अध्यक्ष व संचालक यांच्यावर चौकशीचा फास आवळल्याने व माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ढासू भूमिका असल्याने चौकशीत दोषी आढळणाऱ्या संचालकांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता बळावली आहें, दरम्यान आता निवडणूकीचे बिगूल वाजले असून प्रचाराला सुरुवात झाली आहें, त्यामुळे सगळ्यां संचालकांना नेमकं नोकर भरतीच्या चौकशीत काय होईल याचं टेन्शन वाढलं आहें.
खरं तर मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर तब्बल 13 वर्षांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक यावर्षी होणार असून विद्यमान अध्यक्ष व सत्ताधारी संचालक यांनी एक खेळी करून 2021 मध्ये घटनादुरुस्ती केली व जवळपास 5 संचालकांना ही निवडणूक लढता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली आहें, त्यात डॉ विजय देवतळे, विजय बावणे, उल्हास करपे, प्रकाश बनसोड व पांडुरंग जाधव या संचालकांचा समावेश आहें.
अशी चालल्या गेली चाल?
आपल्या विरोधात कुणी प्रस्थापित संचालक आव्हान उभे करू नये यासाठी 2021 मध्ये बैंक अध्यक्ष संतोष रावत, रवींद्र शिंदे, संदीप गड्डमवार, शेखर धोटे व इतर सत्ताधारी यांनी घटनादुरुस्ती करून ते आव्हानचं संपुष्ठात आणण्याचा प्रयत्न केला आहें. दरम्यान बँकेची प्रारूप मतदारयादी सोमवारी दि.21 एप्रिल ला प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत डॉ विजय देवतळे, विजय बावणे, उल्हास करपे, प्रकाश बनसोड, पांडुरंग जाधव यांची नावे असली तरी त्यांच्या संस्था घटनादुरुस्ती मुळे त्यांच्या संस्थांना ‘क’ ऑडिट वर्गात टाकण्यात आल्याने ते निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी विद्यमान अध्यक्ष संतोषसिंह रावत व संचालक संदीप गड्डमवार, रवींद्र शिंद व शेखर धोटे यांच्या संस्था ‘ब’ वर्ग ऑडिट गटात ठेवल्याने ते अविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. अंतिम मतदार यादी में महिन्याच्या 16 तारखेला प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने में महिन्यातच जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रानधुमाळी सुरु होणार आहें. आहे.दरम्यान आतापासूनच यासाठी धावपळ सुरू केली असून मतांची जुळवाजुळव केली जात असल्याचे दिसून येत आहे.
आजी-माजी खासदार आमदार लागले कामाला?
सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीत मोठा भ्रष्टाचार झाल्यानंतर स्वतःचं तोंड बंद ठेवणारे आजी माजी खासदार आमदार आता बैंकेच्या निवडणुकीत बोलायला लागले असून बँकेची तात्पुरती जाहीर झालेली मतदार यादी बघितली तर खा. प्रतिभा धानोरकर, आ. विजय वडेट्टीवर, आ. किशोर जोरगेवार, माजी मंत्री शोभा फडणवीस या दिग्गजांचा यात समावेश आहे. यांचा अर्थ त्यांची निवडणूक लढण्याची तयारी आहें हे स्पष्ट होतं आहें. त्यात माजी संचालक सुभाष रुपताटे, संजय दोंगरे, सुदर्शन निमकर, रामनाथ कालसर्प पुन्हा निवडणूक लढवायची तयारी करीत आहेत.
निवडणुकीत तिहेरी लढती होण्याची शक्यता.
संभावित निवडणुकीत सद्या दोन गट असले तरी यंदाच्या निवडणुकीत तीन गट रणांगणात एकमेकांविरोधात दंड थोपटण्याची चिन्हे दिसत आहे. या गटांमध्ये भाजपा आणि काँग्रेसचे नेते एकमेकांविरोधात लढणार असले तरी काही ठिकाणी कांग्रेस भाजप हे मिळून लढणार आहेत तर काही ठिकाणी राष्ट्रवादी शिवसेना कांग्रेस मिळून लढणार आहें, सध्या प्रारूप मतदार यादीवर दावे, हरकती व आक्षेप घेतले जात असून, या क्षेप व हरकतींवर 7 मे रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतर विभागीय सहनिबंधकांकडून 13 व 14 मे रोजी निर्णय दिला जाणार आहे. शेवटी 16 मे रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक होणार असल्याने
दुसऱ्या फळीतील नेतेही सज्ज?
सिडीसीसी बँकेची निवडणूक काँस विरुद्ध भाजप अशी होण्याची दाट शक्यता असल्याने दुसऱ्या फळीतील संभाव्य उमेदवारीसाठी दावेदारी दिनेश खारे, सतीश करजुरकर, प्रकाश दैवतले, सुरेश दर्वे, गणेश तर्वेकर, आवेश खान पठाण, तुकाराम पवार, सुरेश महाकुलकर, प्रशांत चिटगुरवार, आसुतोष चटप, सुभाष ताजने, शेषराव बडे पंकज पवार, अमर बोधलावार, जयंत टेमुर्वे, सुधीर मुडेवार बिगुल, रामभाऊ टोगे, स्वीः मारपल्लीवर, बंद्रकांत गुरु विलास विखार नितीन उस अशोक सोनटक्के, श्याम बेरे, सुरेंद्र डोके, संतोष तंगडपल्लीवर निशिकांत बोरकर, सिद्धार्थ पठाडे, मधुकर भगत, एंड सिवलकर, नारायण जांभुळे राजू चिकटे प्रमेश मुधासी सुनंदा ज्ञानेश्वर करे.सी. रागिणी दिगांबर गुरपुडे रुजली रवींद्र शिंदे आलेया शरद जिवतोडे हेही दंड थोपटत आहेत, सोबतय बँकेचे माजी अधिकारी राजेंद्र बरहे मूर्ती सिंगरे, जनार्धन कसे यांनी देखील निवडणुकीत उमेदारी दाखल करण्याचे जाहीर केल्याने चर्चा रंगू लागल्या आहेत.