Home चंद्रपूर क्राईम:- कर्करोगाला निमंत्रण देणाऱ्या सुगंधित तंबाखू विक्रेता वसीम ला कुणाचे संरक्षण?

क्राईम:- कर्करोगाला निमंत्रण देणाऱ्या सुगंधित तंबाखू विक्रेता वसीम ला कुणाचे संरक्षण?

अन्न औषध प्रशासनाला घरापोच पैशाची थैली आल्याने पैशाच्या नशेत साखर झोपेत तर पोलिसांचा आपला वेगळा अंदाज.

चंद्रपूर:-

जिल्ह्यात नकली सुगंधीत तंबाखू व पानमसाला सर्हासपने विकल्या जातं असतांना अन्न औषध प्रशासन मात्र घरापोच पैशाची थैली येत असल्याने साखर झोपेत जणू मौन धारण करून आहे तर पोलीस प्रशासन आपल्या माल सूतो अभियानात मदमस्त आहे, मात्र तंबाखू हा कर्करोगाला निमंत्रण देणारा पदार्थ असून जिकडे तिकडे कर्करोगाचे प्रमाण दिवसेगणिक वाढत असतांना व आरोग्य विभागाच्या वार्षिक अहवालात खर्या हा एकमेव घटक कारणीभूत असल्याचे निष्पन्न होतं असतांना यावर अंकुश लावण्याचे व निर्बंध आणण्याचे काम सोडून अन्न औषधी प्रशासनाचे अधिकारी वसीम झिगरी सारख्या नकली सुगंधित तंबाखू विक्रीचा धंदा करणाऱ्याला संरक्षण देतं असल्याचे बोलल्या जातं आहें.

सर्वच कर्करोगाला तंबाखू सेवन हेच कारण नसले तरी जवळपास 60 टक्के कर्करोग हे तंबाखू किंव्हा तंबाखूजन्य असलेल्या रासायनिक पदार्थांच्या सेवनामुळे होतात, त्यामुळे महाराष्ट्रात तंबाखू विक्रीवर पूर्णता बंदी आहे. तर मग यावर नियंत्रण ठेवण्याचे काम ज्या अन्न औषध प्रशासनाकडे आहें ते काय झोपा काढत आहे कां ? हा प्रश्न उपस्थित होतं आहें, दरम्यान या विभागाचा निरीक्षक सातकर हा संपूर्ण जिल्ह्यात सुगंधित तंबाखू व नकली तंबाखू विक्रेत्याकडून पैसे वसुली करताहेत अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहें.

कोण करताहेत नकली सुगंधीत तंबाखूची अवैध विक्री ?

चंद्रपूर जिल्ह्यात दररोज लाखों रुपयांचा सुगंधीत तंबाखू हा खर्यांत वापरला जातं आहे, तो सुगंधीत तंबाखू नेमका कुठून येतो? तो कोण आणतोय? यांची चौकशी केली असता वसीम झिंगरी चंद्रपूर, जयसुख ठक्कर बल्लारपूर व गणेश (ध्रुव) गुप्ता चंद्रपूर रयतवारी हे तीन महारथी मागील अनेक वर्षांपासून अवैध सुगंधित तंबाखूच्या धंद्यात असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या तिन्ही लोकांनी सुगंधीत तंबाखू ची विक्री कोण कुठे करणार व कुणाला किती पैसे द्यायचे याबद्दल अगोदरच ठरवून घेतले आहे. यामध्ये अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मैनेज केल्याने त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात आपलं अवैध नकली सुगंधित तंबाखूच जाळं उभं केलं आहे.

प्रत्तेक नकली सुगंधीत तंबाखूच्या पेटीमागे 5 हजार कुणाकुणाचे ?

जिल्ह्यात वसीम झिंगरी जयसुख ठक्कर व गुप्ता यांच्या माध्यमातून जो नकली तंबाखू चा धंदा सुरू आहे त्यात अन्न औषधी प्रशासन, पोलीस प्रशासन, राजकीय नेते व पत्रकारांना मैनेज करण्यासाठी प्रत्तेक नकली सुगंधीत तंबाखू च्या पेटीमागे 5 हजार रुपये राखून ठेवले असल्याने दररोज लाखों रुपयांचा हवाला होत असल्याची चर्चा आहे.

भद्रावती पोलीस विभागाशी वसीम झिंगरीचे सरळ संबंध?

जिल्ह्यात अवैध सुगंधित तंबाखू व नकली तंबाखू मिश्रित माजा, इगल व बागवान विक्री करण्यात वसीम झिंगरी जयसुख ठक्कर व गुप्ता यांची नावे समोर असली तरी वसीम झिंगरी हा एवढा चलाख आहें की त्याचा माल क्वचितच पकडला जातो कारण तो सरळ स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस स्टेशनं येथे आपली जबरदस्त सेटिंग लावून असतो, दरम्यान भद्रावती पोलीस स्टेशनं अंतर्गत सुगंधित तंबाखू विक्री करिता वसीम झिंगरी ने पोलीस अधिकारी यांच्याशी सरळ सेटिंग केल्याने खुलेआम अवैध सुगंधित तंबाखू विक्री सुरु असल्याची विश्वसनीय माहिती आहें, आता यावर अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासन काय कारवाई करतील हे पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here