Home चंद्रपूर संतापजनक:- नंदोरी विसलोन परिसरातील सोनाई इन्फ्रा कंपनीने खोदलेले खड्डे धोकादायक.

संतापजनक:- नंदोरी विसलोन परिसरातील सोनाई इन्फ्रा कंपनीने खोदलेले खड्डे धोकादायक.

खोदलेले खड्डे बुजवून शेतकऱ्यांना होणारे संभावित धोक्याला टाळा, जिल्हाधिकारी यांच्याकडे मनसेची मागणी.

भद्रावती /चंद्रपूर :-

चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेच्या तिसऱ्या लाईन करिता नंदोरी विसलोन परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या खाजगी जागेवर लिजच्या नावाखाली नियमबाह्य कोट्यावधीचे अवैध गौण खनिज उत्खनन करून मोठं मोठे खड्डे केल्याने व त्या खड्‌ड्यात जनावरे पडण्याची भीती असल्याने आणि शेतकऱ्यांच्या जाण्यायेण्याच्या मार्गाला अडथळे निर्माण होतं असल्याने सोनाई इन्फ्रा कंपनीवर दंडात्मक कारवाई करून या कंत्राटी कंपनीला काळ्या यादीत टाका अन्यथा नंदोरी विसलोन परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन मनसे तर्फे मोठे जनआंदोलन करण्यात येईल अशी असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहें, यावेळी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश कालबांधे, सुनील गुढे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

वर्धा (सेवाग्राम) बल्लारशाह तिसरी रेल्वे लाईनचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या रेल्वे लाईनचे काम भद्रावती तालुक्यातील विसलोन (नंदोरी) परिसरातून सुरु करण्यात आले. यासाठी सोनाई इन्फ्रा कंपनीला कंत्राट देण्यात आले. तिसऱ्या रेल्वे लाईन च्या कामासाठी सोनाई कंपनीने नंदोरी येथील शेतकऱ्यांना पैश्याचे गाजर दाखवत शेतकऱ्याच्या नावाने लिज घेऊन शेतकऱ्यांच्या शेतातून मुरुमाचे मोठ्या प्रमाणात नियमबाह्य उत्खनन सुरू केलेले असून तिथे मोठं मोठे तलावासारखे खड्डे निर्माण झाले आहे. सदर उत्खनन हे मंजूर लिज च्या अटी शर्ती पेक्षा आणि क्षमतेपेक्षा अधिक केल्या गेल्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल तर बुडालाच शिवाय भविष्यात या उत्खनन केलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे तिथे पाण्यात जनावरे पडून मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

कोट्यावधीचे अवैध गौण खनिज उत्खनन?

कुठलेही उत्खनन करतांना काही मोजमाप असतें व 6 मीटर पेक्षा जमिनीत जास्त उत्खनन करून गौण खनिज काढता येत नाही, पण सोनाई इन्फ्रा कंपनीने सगळे नियम धाब्यावर बसवून भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील चालबर्डी मार्गावर उमरे यांच्या शेतालागत जवळपास ५० ते ६० फूट भल्ला मोठा खड्डा खोदले आहें, त्या खड्ड्याला कोणतीही सुरक्षितता ठेवल्या गेली नसल्याने रस्ता खचण्याची शक्यता आहें, दरम्यान आजूबाजूतील शेतकऱ्यांचा शेतात जाणे कठीण होणार आहे. तर नंदोरी विसलोन मार्गावरील पायघन यांच्या शेतालागत खोदण्यात आलेला खड्डा ऐन उन्हाळ्यात तुडुंब भरला आहे. या शेतात २०० वर्ष जुनी आंब्याची वनराई होती. ही वनराई तोडण्याची वनविभाग कडून परवानगी घेण्यात आली नाही. तर या शेतातून शेतकऱ्यांना शेती पंपा साठी वीज पुरवठा करण्यात येत असलेले पोल सुद्धा चार ही बाजूने खोदल्या गेल्याने मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना आताच शेतात जाणे कठीण झाले आहे. शेतात बैल बंडी घेऊन जाताना बैल दचकला तर बैल बंडी सह शेतकरी खड्यात पडल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या खड्याला संरक्षण भिंत घालणे गरजेचे असतांना उत्खनन करणाऱ्या कंपनीने ते खड्डे तसेच ठेवले आहे व संबंधित लिज धारक शेतकरी आपले हात वरती करत कंपनीकडे बोट दाखवत आहे तर दुसरीकडे कंपनी व्यवस्थापन शेतकऱ्यांची ही जबाबदारी असल्याचे सांगत आहें. मात्र मंजूर खोदकामाच्या जवळपास पाच पट गौण खनीज उत्खनन करण्यात आल्याने शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवीला जातं आहें,

खरं तर सोनाई इन्फ्रा कंपनीकडून वर्धा (सेवाग्राम) बल्लारशाह तिसरी रेल्वे लाईनचे कामाकरिता जे गौण खनिज उत्खननं केले ते नियमबाह्य असून महसूल, खनिकर्म, पोलीस, वनविभाग सह संबंधित गावातील सरपंच लोकप्रतिनिधी यांना लालीपॉप देऊन कंपनीने जणू गप्प केले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच सोनाई इन्फ्रा कंपनी शासनाला करोडो रुपयाचा चुना लावत असतानाही अधिकारी मात्र चुप बसले आहे. मात्र सोनाई इन्फ्रा कंपनी च्या सुरु असलेल्या गोरखधंद्या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नसून जिल्हाधिकारी यांनी त्वरित सोनाई इन्फ्रा कंपनी च्या अवैध गौण खनिज उत्खननं प्रकरणी त्या मंजूर लिज च्या जमिनत झालेल्या गौण खनिज उत्खननाचे मोजमाप करून तेवढा दंड लावावा व बेकायदेशीरित्या केलेल्या गौण खनिज उत्खननं प्रकरणी संबंधित कंत्राटदार यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना काळया यादीत टाकावं आणि खोदकाम केलेल्या सर्व खड्ड्याला संरक्षण भिंत तयार करण्याचे आदेश द्यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व शेतकऱ्यांना व नंदोरी ग्रामस्थाना घेऊन आपल्या कार्यालयासमोर मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातून दिला आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here