अनोळखी मृत व्यक्तीची हत्त्या की आत्महत्त्या याचा पोलीस तपास सुरु.
टेमुर्डा प्रतिनीधी (धनराज मा बाटबरवे ) मो.7498923172
वरोरा तालुक्यातील पिंपळगाव मारुती येथील शेत शिवारात लेडांगे यांच्या शेतामध्ये एक प्रेत आढळल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती ,दरम्यान वरोरा पोलीस स्टेशन येथे याबद्दल माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी प्रेताची तपासणी केली असता त्या मृत व्यक्तीचा अंगामध्ये निळसर रंगाची अंडरवेट होती.
यावेळी पिंपळगाव मारोती पोलीस पाटलीन सौ सोभा दीलीप चंदनबटवे, येन्सा पोलीस पाटील कुणाल शेंदे, पोलीस स्टेशन वरोरा चे सहाय्यक पोलीस मल्लेवार, पोलीस उपनिरीक्षक निरस्कर, रूपेश सोनुले व पोलीस कर्मचारी पुढील कार्यवाही करत आहे