Home Breaking News ओडिशा भीषण रेल्वे अपघातात 60 ठार अनेक जखमी रेल्वे रुळावर रक्ताचा पूर

ओडिशा भीषण रेल्वे अपघातात 60 ठार अनेक जखमी रेल्वे रुळावर रक्ताचा पूर

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

ओडिशा  :-  ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी रेल्वे अपघात झाला. येथील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. टक्कर इतकी जोरदार होती की एक्स्प्रेस रुळावरुन घसरली. 50 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी रेल्वेच्या डब्यात अनेक जण अडकल्याची बाब समोर येत आहे.

रेल्वेची टक्कर इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरुन घसरली. यामुळे एकूण 17 ते 18 डबे रुळावरुन घसरले आहेत. दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैश्वन यांनी मोठी मदत जारी केली आहे. Coromandel Express Accident

ओडिशातील या दुर्दैवी रेल्वे अपघातातील मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी आणि जखमींसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी मदत जारी केली आहे. या अपघातात मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये, गंभीर जखमींसाठी 2 लाख आणि किरकोळ जखमींसाठी 50 हजार रुपये मदत सरकारने जाहीर केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या अंदाजे 200 प्रवाशांना सोरो सीएचसी, गोपाळपूर सीएचसी आणि खंटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. याशिवाय 32 जणांची एनडीआरएफ टीम बचावासाठी पाठवण्यात आली आहे.

दुसरीकडे, ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की लोकांना नेण्यासाठी सुमारे 50 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, परंतु जखमींची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बसेस बोलावण्यात आल्या आहेत

सध्या या मार्गावरील गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. या अपघातात 50 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 332 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना सोरो सीएचसी, गोपाळपूर सीएचसी आणि खंटापाडा पीएचसीमध्ये हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी विशेष मदत आयुक्त नियंत्रण कक्षात जाऊन मदतकार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले की, मी परिस्थितीचा आढावा घेतला. मी शनिवारी सकाळी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेईन.

 

रेलवे ने जारी किया हेल्पलाइन नंबर

हावड़ा- 033-26382217

खड़गपुर – 8972073925, 9332392339

बालासोर – 8249591559, 7978418322

शालीमार (कोलकाता) – 9903370746

Previous articleचंद्रपुरातील आनंद वाईन शॉप निलंबित राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईत 91 गुन्ह्यांची नोंद
Next articleशैक्षणिक :- 10 वी शिक्षणानंतर विद्यार्थ्यांनी हे कोर्स केल्यास आयुष्य बदलेल ? 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here