Home चंद्रपूर नियुक्ती ;- ॲड. अमोल बावणे यांच्या नियुक्तीने राष्ट्रवादीत खळबळ ?

नियुक्ती ;- ॲड. अमोल बावणे यांच्या नियुक्तीने राष्ट्रवादीत खळबळ ?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश राज्य संघटक पदी अमोल बावणे यांची नियुक्ती खुद्द अजित पवार यांनी केल्याने राष्ट्रवादीचे राजकीय समीकरण बदलले.

चंद्रपूर :-

भोई समाजाचे युवा नेते, राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष तथा वरोरा भद्रावती विधानसभा निवडणुकीतील एक वास्तव चेहरा म्हणून ॲड.अमोल बावणे हे समोर येतं असतानाच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजितदादा पवार गट ) महाराष्ट्र प्रदेश राज्य संघटक पदी दस्तुरखुद्द अजित पवार यांनी नियुक्ती केल्याने चंद्रपूर राष्ट्रवादी पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे.

ॲड.अमोल बावणे यांचे संघटनात्मक कार्य चांगले आहे, त्यांची भोई समाजावर संघटनात्मकरीत्या चांगली पकड असून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामधील २०१९ मध्ये वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी कडून विधानसभा निवडणूक लढविली होती. ॲड. अमोल बावणे हे भोई समाजाचे नेते व उच्चशिक्षित युवा तरुण तडफदार नेतुत्व असून त्यांचे संघटनात्मक कार्य खूप मोठे आहे आणि त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेवूनचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशा नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्य संघटक अविनाशजी काकडे यांनी ॲड.अमोल बावणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश च्या राज्य संघटक पदी निवड केली असून त्यांना चंद्रपूर , गडचिरोली, गोदिया, भंडारा व नागपूर या जिल्हातील संघटनात्मक बांधणीव्ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच पक्षाचे धेय्य धोरण सर्वसामन्य नागरीकापर्यंत पोहचविण्यासाठी, पक्ष बळकटीकरणाची व पक्ष संघटन कार्य वाढविण्याची फार मोठी जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे.

ॲड.अमोल बावणे यांच्या राज्य संघटक पदी नियुक्तीने विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन व पक्ष बांधणीचे काम बळकट होणार, त्यामुळे यांची राज्य संघटक पदी नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्या मध्ये सर्वत्र उत्साह संचारला असून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे व सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. सदर नियुक्ती पत्र नामदार अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ॲड.अमोल बावणे यांना देतेवेळी त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्य संघटक अविनाशजी काकडे तसेच पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here