Home Breaking News चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी कांग्रेस पक्षातर्फे प्रतिभा धानोरकर व दिनेश चोखारे सह...

चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी कांग्रेस पक्षातर्फे प्रतिभा धानोरकर व दिनेश चोखारे सह 6 इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  चंद्रपूर लोकसभा 2019 च्या निवडणुकीत कांग्रेसचे बाळू धानोरकर यांनी विजय प्राप्त केला होता, मात्र वर्ष 2023 ला खासदार धानोरकर यांच्या निधनाने हा मतदार संघ रिकामा झाला, आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कांग्रेस पक्षाने चाचपणी सुरू केली आहे.

कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रपूर-आर्णी- वणी लोकसभा मतदार संघासाठी इच्छुकांचे अर्ज मागविले होते, कांग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्याकडे एकूण 8 अर्ज प्राप्त झाले असून आज सर्व अर्ज नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द करणार आहे.

इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये आमदार प्रतिभा धानोरकर, कांग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक  बांगडे, प्रकाश देवतळे, शिवा राव, शंतनू धोटे, दिनेश चोखारे, डॉ. हेमंत खापणे दिलीप माकोडे यांचा समावेश आहे.

सध्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात कांग्रेस पक्षाकडून आमदार प्रतिभा धानोरकर व दिनेश चोखारे हे प्रबळ दावेदार मानल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here