Home चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा ठरला चॅम्पियन चंद्रपूर मनपा व ६ जिल्ह्यांचा सहभाग

चंद्रपूर जिल्हा ठरला चॅम्पियन चंद्रपूर मनपा व ६ जिल्ह्यांचा सहभाग

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

नगर विकास विभाग – विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा संपन्न

चंद्रपूर  :-  १६ फेब्रुवारी – नगर विकास विभाग – विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा नुकत्याच विसापूर येथील तालुका क्रीडा संकुल,बल्लारपुर येथे उत्साहात पार पडल्या. क्रीडा व सांस्कृतिक या दोन्ही स्पर्धांमध्ये चंद्रपूर जिल्हा संघाला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स विजेतेपद मिळाले तर क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर महानगरपालिका संघ तर सांस्कृतिक स्पर्धेत नागपूर जिल्ह्याने दुसरा क्रमांक प्राप्त केला.

कर्मचारी व अधिकारी ही पदांची दरी कमी होऊन सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार होण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असुन नगर विकास विभागाच्या स्पर्धा या शासनाच्या इतर विभागांपेक्षा अधिक नियोजनबंद्ध व सुविधापूर्ण घेतल्या जातात.

आयोजन करण्यास मिळालेल्या अत्यंत कमी कालावधीत स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले असल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी स्पर्धेच्या समारोप व बक्षीस वितरण प्रसंगी सांगितले.यावेळी विभागीय सहायक आयुक्त संघमित्रा ढोके,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त अशोक गराटे,उपायुक्त मंगेश खवले तसेच सर्व नगर परिषद,नगर पंचायत यांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

१२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान विसापुर क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये नागपूर जिल्हा,चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली,वर्धा असे सहा जिल्हे व चंद्रपूर महानगरपालिका मिळुन विभागातील सुमारे ६०० कर्मचारी व अधिका-यांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेतील सर्व क्रीडा प्रकार बाद पद्धतीने खेळवण्यात येऊन क्रिकेट, कबड्डी,रस्सीखेच,बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, कॅरम, लांब उडी, बुद्धीबळ या क्रीडाप्रकारांसह सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या.सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी प्रत्येक संघाला ६० मिनिटे वेळ देण्यात आला. सर्व संघांनी उत्तम प्रकारे कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

व कार्यक्रमाच्या अखेरीस स्पर्धेचे पुढील आयोजक भंडारा जिल्ह्याला मशाल सुपूर्त करण्यात आली. जिल्हा क्रीडा कार्यालयाद्वारे नियुक्त ४० पंचांद्वारे क्रीडा स्पर्धेचे तर सुनील मोहोरे,हिमांशु रंगारी,टिकू दयालवार,प्रोफेसर मानस रामटेके यांनी सांस्कृतिक स्पर्धेचे पंच म्हणुन काम पाहिले

स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यास विविध समित्या गठीत करण्यात आल्या होत्या यात आयोजन समिती, स्वागत – समारोप समिती, मैदानी स्पर्धा समिती, वैद्यकीय समिती,तक्रार निवारण समिती क्रीडा साहित्य व क्रीडांगण समिती, बक्षीस वितरण समिती, भोजन व निवास व्यवस्था समिती, सांस्कृतिक समिती, पंच समन्वय व खरेदी व खर्च व्यवस्थापन समिती यांसारख्या समित्यांचा समावेश होता.

#CMC #CCMC #chandrapurian #chandrapurnews #plasticfree #MunicipalCorporation #NagarPanchayat #nagarparishad #cmccommissioner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here