Home चंद्रपूर सनसनिखेज:- चंद्रपूर लोकसभेत वंचितचे उमेदवार ठरणार राजेश बेले,

सनसनिखेज:- चंद्रपूर लोकसभेत वंचितचे उमेदवार ठरणार राजेश बेले,

वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर नामांकन फॉर्म भरताना राहणार उपास्थित.

चंद्रपूर :-

वंचित बहुजन आघाडी चे प्रमुख प्रकाश आंबेडकर या लोकसभा निवडणुकीत पुन्हा 2019 प्रमाणे राजकीय चित्रपटाचा ‘फ्लॅशबॅक’ महाविकास आघाडीला दाखविणार असल्याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले असून महाराष्ट्रात अनेक लोकसभा क्षेत्रात त्यांनी संभावित उमेदवाराची नावे निश्चित करून ठेवली आहे, त्यात चंद्रपूर वणी आर्णी क्षेत्राचे संभावित उमेदवार असलेले सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलल्या जातं आहे, दरम्यान येत्या बुधवारला राजेश बेले उमेदवारी नामांकन फॉर्म भरते वेळी खुद्द प्रकाश आंबेडकर उपस्थित रहाणार असल्याची विशेष सूत्रांकडून माहिती आली आहे.

भाजप ची बी टीम म्हणून महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी बद्दल नेहमी बोलल्या जातं असतांना आता ती पुन्हा महाविकास आघाडी चा खेळ करण्याच्या मानसिकतेत असून कांग्रेस राष्ट्रवादी यांच्या मताची विभागणी करणार असल्याने त्याचा फायदा हा भाजपा उमेदवाराला होण्याची चिन्हे दिसत आहे, मात्र मागील वेळी माळी समाजाचे पडोळे हे वंचित चे उमेदवार होते त्यांनी 1 लाख 12 हजार मते घेत भाजप उमेदवार हंसराज अहिर यांच्या मतांवर सुद्धा डाव साधला होता, दरम्यान राजेश बेले हे तेली समाजाचे असल्याने ते सुद्धा भाजप च्या उमेदवाराची हक्काची मते आपल्याकडे वळवू शकतात जशी अँड दत्ता हजारें यांनी बसपा कडून लोकसभा निवडणूक लढताना वळवली होती.

वंचित बहुजन आघाडी चे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी आणि खास करून काँग्रेससोबत ‘फिगर गेम’ खेळता खेळता महाविकास आघाडी चा गेम करत असल्याची चिन्हे दिसत आहे, एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आपली युती झाली म्हणून जाहीर करायचे, कांग्रेस च्या सात जागावर पाठिंबा द्यायचा, दुसरीकडे मात्र शरद पवार यांच्यावर टीका करायची आणि मी महाविकास आघाडी सोबतच असल्याची माहिती प्रसारामाध्यमाना द्यायची ही खेळी प्रकाश आंबेडकर करत असून ते फिगर गेम च्या चक्रव्युहात आघाडीला फसवून पुन्हा 2019 प्रमाणे राजकीय चित्रपटाचा ‘क्लायमॅक्स’ दाखविणार असल्याचे दिसत आहे, मात्र त्यांचा क्लायमॅक्स’ राजेश बेले यांच्या उमेदवारीने कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर की भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यापैकी कुणाच्या पथ्यावर पडते हे पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहे.

Previous articleब्रेकिंग:- अखेर चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीचा सस्पेन्स संपला आमदार प्रतिभा धानोरकर यांना कांग्रेसची उमेदवारी.
Next articleजनता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची उत्कर्ष साठी निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here