Home चंद्रपूर दोन जिव,दोन कुटुंब,दोन परिवार यांना जोडणारा सोहळा म्हणजे पवित्र विवाह होय. ...

दोन जिव,दोन कुटुंब,दोन परिवार यांना जोडणारा सोहळा म्हणजे पवित्र विवाह होय. खा.नेते यांचे सामूहिक विवाह सोहळ्याला प्रतिपादन

दोन जिव,दोन कुटुंब,दोन परिवार यांना जोडणारा सोहळा म्हणजे पवित्र विवाह होय.

खा.नेते यांचे सामूहिक विवाह सोहळ्याला प्रतिपादन

युवा कुणबी समाज सेवा समिती च्या वतीने सामूहिक विवाह सोहळा..

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर

चंद्रपूर:- गोंदिया जिल्हा सालेकसा तालुक्यातील साकरीटोला (सातगांव) येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सामाजिक पंरपरा जोपासत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. आज दिंनाक ०७ एप्रिल २०२४ रोज रविवारी युवा कुणबी समाज सेवा समिती द्वारा आयोजित मौजा-साकरीटोला (सातगांव) ता.सालेकसा जि.गोंदिया हया आयोजित सामूहिक विवाह सोहळाला खासदार अशोक नेते यांनी उपस्थित राहून नव दांपत्यास शुभाशीर्वाद दिले.
यावेळी खा.नेते यांनी बोलतांना दरवर्षी या साकरीटोला येथे युवा कुणबी समाज सेवा समितीने सामूहिक विवाह सोहळा आयोजित करत असते‌ अशा विवाह सोहळ्याला शुभेच्छा विवाह सोहळा म्हणजे दोन जिव,दोन कुटुंब,दोन परिवार यांना जोडणारा सोहळा म्हणजे पवित्र विवाह आहे.विवाहाध्ये विनाकारण अनेक पैशाची उधळण होते. यात कर्ज सुद्धा काढून विवाह सोहळा केला जातो.अशावेळी अशा सामूहिक विवाह सोहळ्याची समाजाला नितांत अवश्यकता आहे.त्यामुळे असे विवाह सोहळे आयोजित करावे.असे प्रतिपादन या विवाह सोहळ्या प्रसंगी खा.नेते यांनी केले.

याप्रसंगी कार्यक्रमाला प्रामुख्याने समितीचे अध्यक्ष देवराव चुटे,अरविंद फुंडे,रामदास हतिमारे,पृथ्वीराज शिवणकर, पुरूषोत्तम कोरे,योगेश बहेकार, चंद्रकुमार बहेकार तसेच मोठ्या संख्येने विवाह सोहळ्यातील वऱ्हाडी मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here