Home चंद्रपूर नवनिर्वाचित खासदार महोदयांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा ,व्याहाड खुर्द येथे संपन्न. ...

नवनिर्वाचित खासदार महोदयांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा ,व्याहाड खुर्द येथे संपन्न. संविधान विरोधी धोरणामुळे केंद्रातील मोदी सरकारला ४०० पार करणे सुद्धा कठीण,जनतेनी त्यांना नाकारले – विजय वडेट्टीवार,विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य.

गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसाण यांचे सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे स्वागत व सत्कार

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर

सावली :- नुकतेच देशात लोकसभेची सार्वत्रिक निवडूक पार पडले, त्या अनुषंगाने नवनिर्वाचित खासदार मान्यवरांचा जाहीर सत्कार व मार्गदर्शन सोहळा आज श्री.निखिल सुरमवार यांच्या भव्य प्रांगणात मौजा.व्याहाड खुर्द येथे पार पडला, तब्ब्ल १० वर्षानंतर विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा.श्री.डॉ.नामदेवराजी किरसाण हे १ लक्ष ४०००० च्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

नवनिर्वाचित खासदार मान्यवरांच्या जाहीर नागरी सत्कारा-प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार तर उदघाटक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर व चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक मा.सतीश वारजूकर तर सत्कारमूर्ती नवनिर्वाचित गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा.श्री.डॉ.नामदेवराजी किरसाण हे उपस्थित होते,हजारो कार्यकर्त्याच्या उपस्थितीने सत्कार सोहळ्याचा कार्यक्रमातुन कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात नवी ऊर्जा व उत्साह दिसून आला.

मार्गदर्शन सोहळ्याला उपस्थित जनतेला संबोधित करताना विरोधी पक्षनेते मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी “. देशातील मोदी सरकारने १० वर्षाच्या काळात सामान्य जनता,शेतकरी,युवा वर्ग यांची दिशाभूल केली,संविधान विरोधी, हुकूमशाही मोदी सरकारला जनतेनी नाकारले असून त्यांना ४०० पार सुद्धा करता आले नाही, जनतेनी देशात तसेच राज्यात काँग्रेस पक्ष तसेच इंडिया आघाडीला मोठ्या प्रमाणात जनाधार दिला, विदर्भ हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा गड, सर्वांच्या मेहनीतीमुळेच काँग्रेसला लोकसभेत यश मिळाले आहे,भविष्यात होण्याऱ्या निवडणुकात काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडी सत्ता स्थापन केल्या शिवाय राहनार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो, ज्या प्रमाणे आपण सर्वांनी लोकसभेत सक्रिय होऊन पक्षासाठी मेहनत घेतली त्याचं प्रमाणे येत्या निवडणूकात सुद्धा अधिक सक्रिय होण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलेले आहे.

नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेवराव किरसाण यांनी जाहीर नागरी सत्काराप्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटी तसेच सर्व मतदार पदाधिकारी व कार्यकर्तागण यांचे आभार मानले तसेच आपण जनतेच्या समस्या सोडण्यासाठी सैदव कार्यतत्पर असू असा विश्वास व्यक्त केलेला आहे.तसेच मार्गदर्शन शिबिराला अनेक मान्यवरांनी नागरिकांना संबोधित केले आहे.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकाडालवार, माजी जिल्हा परिषद सदस्य मा.ऍड.रामभाऊ मेश्राम, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.महेंद्र ब्राम्हणवाडे, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर मा.दिनेश पाटील चिटणुरवार, माजी जि.प.सदस्य मा.मनोहर पा.पोरेटी,आदिवासी सेल गडचिरोली जिल्हा अध्यक्ष मा.हनुमंत मडावी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव मा.बंडू पाटील बोरकुटे,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.विजय मुत्यालवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.हिवराज पाटील शेरकी, उपाध्यक्ष मा.दिवाकर पाटील भांडेकर,तालुका अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे,उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकर, माजी सभापती पंचायत समिती मा.राकेश पाटील गड्डमवार,तसेच सभापती मा.विजय कोरेवार,सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.पुरषोत्तम चुदरी, व्याहाड खुर्दच्या सरपंच सौ.सुनीता उरकुडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे माजी सचिव मा.नरेश सुरमवार, युवा तालुका अध्यक्ष मा.किशोर कारडे,महिला शहर अध्यक्षा सौ.भारती चौधरी तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तागण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.निखिलभाऊ सुरमवार,गाव काँग्रेस कमिटी व्याहाड खुर्द यांचे विशेष सहकार्य लाभले,कार्यक्रमाचे प्रास्तविक तालुका अध्यक्ष मा.नितीन गोहने,तर सूत्रसंचालन मा.चंचल रोहनकर तर आभार श्री.रुपेश किरमे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here