Home चंद्रपूर रानडुक्करांचा कायमचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांना परवानगी द्या ; नगरसेवक सतीश बोम्मावार यांची...

रानडुक्करांचा कायमचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांना परवानगी द्या ; नगरसेवक सतीश बोम्मावार यांची मागणी विभागीय वन अधिकारी खाडे यांनी घेतली जखमींची रुग्णालयात भेट

रानडुक्करांचा कायमचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांना परवानगी द्या ; नगरसेवक सतीश बोम्मावार यांची मागणी

विभागीय वन अधिकारी खाडे यांनी घेतली जखमींची रुग्णालयात भेट

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर

सावली:-सावली शहरासह तालुक्यात सद्या रानडुक्करांचा धुमाकूळ ने शेतकरी त्रस्त झाले असून या रानडुक्करांच्या वाढत्या हल्ल्यामुळे सावली तालुक्यातील या महिन्याभरात 10 घटना घडलेले असून त्यात दोघांचा मृत्यू तर 10 जण जखमी झाले आहेत.तसेच घटना या रोजच वाढत आहे.त्यामुळे शेतकरी सुद्धा भयभीत आहे. या रानटी डुकरांच्या कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी द्यावी अशी मागणी भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी वनविभागाकडे केली आहे.

 

सावली शहरातील नगरसेवक सतिश बोम्मावार यांच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये आकुलवार यांच्या घराजवळ रानटी डुकराने हल्ला करीत 4 जणांना गंभीर जखमी केले तसेच याच भागातील रस्त्यावरून येणाऱ्या शाळकरी 3 मुलीवर हल्ला करून जखमी केले व पंचायत समिती समोर शेतकरी आनंदराव चौधरी या शेतकऱ्याला ठार केला.एकाच दिवशी 3 घटना मध्ये 1 ठार व 7 गंभीरपणे जखमी झाल्याने खळबळ माजली.त्यामुळे सावली शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. या रानटी डुकरांच्या बंदोबस्त करा अशी मागणी करीत जखमीना त्वरित मदत करा अशी मागणी करीत नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी वनमंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार माहिती दिली.

आज सावली शहरात 100 हुन अधिक जण वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वाखाली रानटी डुकराला पकडण्यासाठी मोहीम आखली यात नगरसेवक अंतबोध बोरकर यांच्या सोबत काही सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यांची साथ लाभली आणि दिवसभराचा शोधार्थ त्या रानटी डुकराला जेरबंद करण्यात यश आले.

 

विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे यांनी आज गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात व सावली ग्रामीण रुग्णालयात भेट दिली आणि जखमींची विचारपूस केली.यावेळी त्यांच्या सोबत नगरसेवक सतीश बोम्मावार हे उपस्थित होते.

मृतकांच्या परिवाराला व जखमी झालेल्या परिवाराना त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी विभागीय अधिकारी प्रशांत खाडे यांना केली तर लवकरात लवकर कागदपत्रे जमा करावी त्वरित मदत देण्याचे कारवाई करू असे आश्वासन यावेळी खाडे यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here