१ कोटी ७ लाख प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक….
भद्रावती :- विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या भद्रावती शाखेतून ३६ खातेदाराची १ कोटी ७ लाख रुपये बँक अधिकाऱ्यानेच परस्पर स्वतःच्या खात्यात वळते केल्याची घटना नोव्हेंबर २०२४ मध्ये घडली होती. शाखा व्यवस्थापक अमोल कठाडे यांच्या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी दोन महिन्यांनी दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. रजत इटणकर (रा. चंद्रपूर) व सूरज शाहू (रा. नागपूर) असे अटकेतील बँक कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
कोकण ग्रामीण बँकेचे मुख्य शाखा व्यवस्थापक अमोल कठाडे हे १ सप्टेंबर २०२४ पासून १५ दिवसांकरिता रजेवर होते. त्या कालावधीत बँकेचे मुख्य अधिकारी म्हणून रजत इटनकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. या काळात बँकेच्या ३६ खातेदारांचे १ कोटी ७ लाख रुपयांची रक्कम इटणकर यांनी स्वतःच्या खात्यात व बँकेचे दुसरे कर्मचारी सूरज यांच्या खात्यात वळती केले. ही बाब मुख्य शाखा व्यवस्थापक कठाडे यांच्या लक्षात आली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिली. गैरव्यवहाराबाबत ८ नोव्हेंबरला भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली.
८ सप्टेबर २०२४ रोजी बँकेतील गैरव्यवहाराची तक्रार
तपास सुरूच; आरोपी वाढणार
या घटनेचा तपास ठाणेदार अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संजय मिश्रा यांनी पूर्ण केला. त्यांनी यातील दोन आरोपींना अटक केली. इटणकर याला न्यायालयीन कोठडी मिळाली तर सुरज शाहू याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा सहभाग आहे का, याचाही पोलिस घेत आहेत. तपास पूर्णत्वाच आल्यानंतर आणखी काही आरोपींची अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.