“बल्लारपूर पोलिसांची कारवाई: चंद्रपूरच्या तिन तरुणांकडून जप्त केला देशी कट्टा आणि जिवंत काडतूस!”
बल्लारपूर :- बल्लारपूर पोलीसांनी एक देशी कट्टा व एक जिवंत काडतूस सह तीन युवकांना अटक केली सदर कारवाई २५ मार्च रोजी करण्यात आली. अभि वाल्मीक साव (२४) रा. दत्त नगर चंद्रपूर, FCविनीत तावाडे (२४) रा. बापट नगर चंद्रपूर, संकेत रविंद्र येसेकर रा. राजनगर पठाणपुरा रोड चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. बल्लारपूर पोलीसांनी एक देशी कट्टा व एक जिवंत काडतूस सह तीन युवकांना अटक केले. २५ मार्च रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथक चे सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे हे डि.बी. स्टॉफसह पेट्रोलींग करित असतांना त्यांना गोपनीय माहिती की साईबाबा वार्ड, बल्लारपुर येथे ३ युवक देशी कट्टा घेऊन फिरत आहेत,
News reporter :- अतुल दिघाडे
त्यावरून त्यांना ताब्यात घेत एक लोखंडी गावठी बनावटीचा देशी कट्टा ज्याची एकुण लांबी २४ सेमी बॅरलची लांबी ११ सेमी, बॅरलची गोलाई ५.५ सेमी, बॅरल पासुन लाकडी मुठेची लांबी १३ सेमी असलेली किंमत २० हजार रुपये व एक नग पितळी धातुचे जिवंत बुलेट ज्याची लांबी ७.५ सेमी बुलेट पितळी धातुचे असुन त्याची गोलाई ४ सेमी बुलेटच्या मागिल बाजुच्या पेंदयावर ८ एम.एम. के.एफ. असे लिहलेले किंमत २ हजार रुपये असे एकुण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्या जवळून जप्त करण्यात आला. आरोपी अभि वाल्मीक साव (२४) रा. दत्त नगर चंद्रपूर, विनीत नानाजी तावाडे (२४) रा. बापट नगर चंद्रपूर, संकेत रविंद्र येसेकर रा राजनगर पठाणपुरा रोड चंद्रपूर यांचा विरुध्द अप क्रं. २२४/२०२५ कलम ३,२५ भारतीय हत्यार कायदा १९५९ अन्वये गुन्हा नोंद करुन तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे,
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे, सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, परि.पो.उप.नि. सौरभ साळुखे, परि.पो.उप.नि. सुनिल धांडे, सफौ. आंनद परचाके, पो. हवा. सुनिल कामटकर, पो.हवा. पुरुषोत्तम चिकाटे, पोहवा. संतोष दंडेवार, पो.हवा. संतोष पंडित, पोहवा. सत्यवान कोटनाके, पो.अं. वशिष्ट रंगारी, लखन चव्हाण, शरदचंद्र कारुष, शेखर माथनकर, भास्कर चिचवलकर, चापोअ. कैलास चिचवलकर, म.पो.अं. अनिता नायडु सह गुन्हे शोध पथकांनी केली आहे,