Home Breaking News जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिन उत्साहात साजरा

जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिन उत्साहात साजरा

जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, सेवा भावना आणि नेतृत्वगुणांचा विकास

चंद्रपूर :- चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि मान्यवर पाहुण्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सामाजिक जाणीव, सेवा भावना आणि नैतिक मूल्यांचा प्रसार करण्याचा हेतू या उपक्रमामागे होता.

News reporter :- अतुल दिघाडे

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. के. एस. ठाकरे (प्रमुख, शारीरिक शिक्षण विभाग) यांनी भूषविले. आपल्या प्रभावी भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना NSS च्या कार्यपद्धतीची ओळख करून देत समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. “NSS हा केवळ उपक्रम नसून, तो विद्यार्थ्यांना सजग नागरिक घडवण्याचा एक प्रभावी मंच आहे,” असे ते म्हणाले.

मुख्य अतिथी म्हणून डॉ. मोहित सावे (विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती) यांची उपस्थिती लाभली. “कॉलेज जीवनात NSS चे महत्त्व” या विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सेवा, नेतृत्व, संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी या NSS च्या प्रमुख अंगांबाबत जागरूक केले. आपल्या वैयक्तिक NSS अनुभवांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

कार्यक्रमास डॉ. P. S. Jogi (रसायनशास्त्र विभागप्रमुख व सीनेट सदस्य, गोंडवाणा विद्यापीठ), डॉ. N. R. Baig (IQAC समन्वयक), आणि डॉ. J. L. Padghan (मराठी विभागप्रमुख) यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शान अधिक वाढली.

कार्यक्रमाची प्रस्तावना NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर बलकी यांनी केली. त्यांनी NSS ची स्थापना, उद्दिष्टे, व महाविद्यालयातील NSS च्या उपक्रमांची माहिती दिली.

प्रा. गणेश येरगुडे यांनी सुत्रसंचालनाच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमाची आखणी, वेळापत्रक, आणि सहभागींची जबाबदारी समर्थपणे सादर केली.

प्रा. H. R. Atram यांनी उपस्थित पाहुणे, विद्यार्थी आणि आयोजकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

कार्यक्रमात क्रांतिवीर सिडाम आणि कु. तनुजा देवाळकर या NSS स्वयंसेवकांनी त्यांच्या अनुभव कथनातून उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी NSS च्या माध्यमातून त्यांनी अनुभवलेल्या शिबिरांची, स्वच्छता मोहिमा, अनाथाश्रम भेटी, आणि सामाजिक उपक्रमांची माहिती देत, NSS कसे जीवनातील मूलभूत शिकवण देतो यावर भर दिला.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व उपस्थितांनी NSS च्या तत्त्वांची अभिव्यक्ती करत पुढील कार्यक्रमातही सक्रिय सहभाग घेण्याची तयारी दर्शवली.

हा NSS स्थापना दिन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि भावनिक विकासासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरले असून, भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन नियमितपणे केले जाईल, अशी भावना महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केली.