मोटार वाहन निरीक्षक विशाल कासंबे व गोविंद पवार घटनास्थळी उपस्थित असल्याची माहिती पण मग त्यांना अटक का नाही?
RTO चा पंचनामा भाग -8
चंद्रपूर प्रादेशिक परिवहन विभाग हे सर्वसामान्य जनतेच्या लुटीचे केंद्र बनले असून दररोज कमिशन व एंट्री फी च्या रूपाने लाखों रुपयाची अवैध वसुली इथे सुरु असतांना RTO च्या चंद्रपूर तेलंगना सिमा नाका असलेल्या लक्कडकोट येथे सुद्धा सुरु असलेल्या अवैध वसुलीवर प्रतिबंध लावण्यासाठी दिनांक 21 फेब्रुवारी 2025 ला अमरावती येथील एसीबी च्या टीम ने धाड टाकून सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी विभुते यांच्यासह एका खाजगी एजंट ला 500 रुपयाची लाच घेतांना रंगेहात अटक केली होती, या घटनेच्या वेळी मोटार वाहन निरीक्षक विशाल कासंबे व गोविंद पवार घटनास्थळी उपस्थित असल्याची माहिती आहें, पण एसीबी च्या पथकाने त्यांना अटक केली नाही याचे आश्चर्य वाटतं असून या सिमा नाक्यावर सुरु असलेले सिसिटीव्ही कैमेरे चे व्हिडीओ फुटेज गायब केले असल्याचे एसीबी च्या कार्यवाहीतून दिसत आहें, कारण एसीबी चा एवढा मोठा ट्रॅप असतांना अटक करतांनाचे व्हिडीओ राजुरा पोलीस स्टेशन येथे जमा व्हायला हवे होते व पोलिसांकडून ते सिसिटीव्ही फुटेज प्रसारामाध्यमांना द्यायला हवे होते, मात्र एका साप्ताहिक श्रमिक मंथन या वृत्तपत्राने दावा केल्याप्रमाणे एसीबी टीम ला 50 लाख रुपये RTO अधिकाऱ्यांनी दिले असल्याच्या बातमीला बळ मिळतं असून या घटनेची वाच्यता बाहेर येऊ नये यासाठी लक्कडकोट सिमा नाक्यावर असलेले सिसिटीव्ही फुटेज गायब केले असावे अशी शंका निर्माण होतं आहें, दरम्यान पोलीस कार्यवाहीत एखादा पुरावा नष्ट करणे हा एक गंभीर गुन्हा असून तो गुन्हा एसीबी कडून RTO अधिकाऱ्यावर होणार कां? याबद्दल शंकाच आहें,
एखाद्या लाच मागण्याच्या गुन्ह्यातील प्रकरणात जर एखादा व्यक्ती दोषी असेल तर एसीबी त्याला एकट्याला अटक करते, परंतु जर एखाद्या विभागाचे सर्वच अधिकारी कर्मचारी सामूहिक वसुलीमध्ये लिप्त असेल तर त्या विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यासह त्यांच्या सहायकाला सहआरोपी म्हणून अटक केल्या जाते, मात्र एसीबी अमरावती टीम ने चक्क मोटार वाहन निरीक्षक विशाल कासंबे व गोविंद पवार या दोन अधिकाऱ्याना घटनास्थळी उपस्थित असतांना सुद्धा अटक केली नाही, मग ते प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर असलेल्या मोरे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आंनद मेश्राम यांच्यावर गुन्हे कसे दाखल करतील? हा गंभीर प्रश्न आहें. RTO च्या सिमा नाक्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्या ठिकाणी असलेल्या सिसिटीव्ही कैमेरे च्या फुटेजला गायब केले असावे अशी शंका आहें, कारण एसीबी च्या कार्यवाहीतील सिसिटीव्ही फुटेज हे पुरावा म्हणून पोलिसांच्या चार्जशीट मध्ये नमूद असतें पण जर हा पुरावाच नष्ट करण्यात आला असेल तर यामध्ये RTO अधिकारी आणि एसीबी चे अधिकारी यांच्यात मोठी डिल झाली असावी अशी दाट शक्यता आहें, विशेष म्हणजे जेंव्हा 21 फेब्रुवारीला एसीबी ची धाड पाडली गेली त्यावेळी सिसिटीव्ही जर साबूत असतील तर तीचे चाललेल्या एसीबी कार्यवाहीचा ग्राउंड रिपोर्ट समोर येऊ शकतो. पण सूत्रांच्या माहितीनुसार त्यावेळी ते कैमेरे बंद होते अशी खोटी माहिती RTO अधिकारी तापसी अधिकाऱ्याला सांगू शकतात.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या चंद्रपूर पदाधिकाऱ्यांची राज्य परिवहन आयुक्ताकडे बैठक.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य सरचिटणीस आरिफ भाई शेख यांच्या माध्यमातून मुंबईच्या राज्यस्तरीय पदाधिकारी यांच्यासह चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष महेश वासलवार व उमाशंकर तिवारी हे राज्याचे परिवहन आयुक्त आयुक्त विवेक भिमनवार यांच्याशी दिनांक 13 मार्च ला होणाऱ्या बैठकीत भेटणार असल्याने व राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांना सुद्धा मुंबई ला मनसे वाहतूक सेनेचे पदाधिकारी स्वतः निवेदन घेऊन भेटणार असल्याने या सर्व प्रकरणाला वेगळे वळण मिळून RTO विभागातील भ्रष्टाचाराचा प्रमुख चेहरा असणारे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांच्यावर निश्चितपणे एसीबी च्या या कार्यवाहीत गुन्हे दाखल होईल अशी अपेक्षा वाढली आहें.