काय आयपीएस अधिकारी अनिकेत हिरडे करणार वसुलीबाज ट्राफीक ईन्चार्ज नरेंद्र तुमसरे, रमेश यादव वर कारवाई?
राजुरा प्रतिनिधी :–
पोलिसांना खाकी वर्दी जनतेच्या सुरक्षेसाठी दिली की पैसे कमाविण्यासाठी हेच मुळात कळायला मार्ग नसून “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या पोलीस ब्रीद वाक्याला जणू हडताळ फासला जातं असल्याचा प्रकार दिसत आहें, अर्थात सर्वच पोलीस तसें नसतात पण बोकळालेला भ्रष्टाचार आणि अवैध धंद्याची रेलचेल असल्याने पोलीस प्रशासनाला पैसे उकळण्याची नामी संधी आपोआप चालून आल्याने पैसे कोण सोडणारं? अशाच एका राजुरा पोलीस स्टेशनं च्या दोन ट्राफिक पोलिसांनी आपले कारनामे मागील अनेक महिन्यापासून सुरु ठेवले असून वसुलीबाज ट्राफीक ईन्चार्ज नरेंद्र तुमसरे, रमेश यादव हे महिन्याकाठी लाखों रुपयाची वसुली ट्रान्सपोर्ट कंपन्या वं इतरांनाकडून करत असल्याची मोठी चर्चा या परिसरात होतांना दिसत आहें.
राजुरा पोलीस स्टेशनं मध्ये नुकतेच आयपीएस अधिकारी ट्रेनिंग करिता ठाणेदार पदाची खुर्ची सांभाळत आहें, त्यांनी आपल्या पहिल्याच परेड मध्ये जाहीर केलं की मी माझा चहा सुद्धा स्वतःच्या पैशानी पितो त्यामुळे आता तुम्ही बाकीचं समजून घ्यायचं, मला काही कळालं तर मी कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, पण ठाणेदार यांनी दिलेल्या तंबी नंतर सुद्धा वसुलीबाज ट्राफीक ईन्चार्ज नरेंद्र तुमसरे, रमेश यादव हे हप्ता वसुली जोमात करत असल्याची माहिती समोर आल्याने आयपीएस अधिकारी अनिकेत हिरडे वसुलीबाजावर कारवाई करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहें