Home वरोरा भ्रष्टाचार :- टेमुर्डा येथील ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी बोरचाटेवर होणार कारवाई?

भ्रष्टाचार :- टेमुर्डा येथील ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी बोरचाटेवर होणार कारवाई?

गावातील विकास कामात गैर व्यवहार केल्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी यांच्याकडे विभागीय चौकशीची मागणी.

टेमुर्डा (वरोरा धनराज बाटबरवे):-

मागील दोन वर्षापासून टेमुर्डा ग्राम पंचायतचा कार्यभार स्वीकारल्यापासून ते आजतागायत ग्राम विकास अधिकारी पी. एल. बोरचाटे व सरपंचा सुचिता ठाकरे या दोघांनी संगनमताने त्यांनी केलेल्या विकास कामात मोठा गैर व्यवहार करून व खोटे बिले सादर करून शासकीय निधींचा अपहार केल्याने टेमुर्डा येथील ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी बोरचाटेवर विभागीय चौकशी करून कारवाई करा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य मयूर विरुटकर व फकीरचंद कोटांगले यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतून केली आहें, त्यामुळे ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी बोरचाटेवर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहें.

ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी बोरचाटे व सरपंच सुचिता ठाकरे हे संगणमत करून ग्राम पंचायत कार्यालयात होणाऱ्या मासिक सभेच्या पटलावर कॅश बुक, पासबुक सभागृहाला न दाखविता पदाचा गैर वापर करून निधीची उचल केल्या गेलेली आहे. तसेच सदस्याना असभ्य, उद्धट वर्तणूक ग्रा. वि. अ. यांचेकडून केल्या जात असल्याची सदस्यांची तक्रार आहें, दरम्यान आतापर्यंत मौजा टेमुर्डा, पिंपळगाव (मा.), चिंचाळा व इतर ठिकाणी केलेल्या नाली बांधकाम व सिमेंट कांक्रेटिंग रोड मध्ये अंदाज पत्रकांपेक्षा जास्तीचे (आगावू) बांधकाम साहित्याची बिले अतिरिक्त जोडून शासकीय निधीची अपरातपर केल्या गेलेली आहे. सोबतच इलेक्ट्रिक साहित्यात तर मोठा भ्रष्टाचार आहें, एवढेच नव्हे तर गौण खनिज उत्खननाबाबत ग्रा. प. टेमुर्डाकडून तिन हजार रु. NOC (नाहरकत प्रमाणपत्र) असे घेण्याचे सभागृहात ठराव केल्या गेला होता. परंतु सामान्य फंडाची पावतीच दिल्या जात नव्हती. सदर रकमेचा हिशेब सभागृहाला दिल्या जात नाही.

ग्रा. प. टेमुर्डा कार्यालयाकडून कुटल्याही अधिकृत निविधा (Tender) न काढता ग्रा. वि. अ. टेमुर्डा व सरपंचा यांचे संयुक्त विद्यमाने संपूर्ण आर्थिक व्यवहार व संबंधित कामे स्वतः ग्राम पंचायत, टेमुर्डा करीत आहे. ग्रा. प. टेमुर्डा मध्ये संबंधित कामे करीत असतांना वाढीव लेबर दाखवून नमुना १९ मध्ये जास्तीच्या हेजेरी पट दाखवून निधीची परस्पर उचल केल्या गेली आहे. तसेच मासिक सभेमध्ये अनेकदा खर्च नामंजूर करण्यात आलेले ठराव प्रोसेडींगला घेतल्या जात नाही व याबाबत ग्रा. वि. अ. यांना विचारणा केली असतांना सभागृहामध्ये आमसदस्यांना आकसापोटी हेतू पुरस्परपणे उद्धट, असभ्य व एकेरी भाषेत शब्दे बोलून आम्हाला अपमानित केल्या गेले आहे. यांच्या कार्यालयात झालेल्या संभाषणात हात -वारे करून आवाज चढवून उन्माद्यपणे बोलून उपमानीत केल्या गेल्याचा मोबाईल मध्ये चित्रीकरण करून पुरावा उपलब्ध आहे. ग्रा. प. टेमुर्डामध्ये बकरी बाजार लिलावाबाबत महत्वाची सर्वसाधारण मासिक सभा घेण्याचे ठरले परंतु सादर सभेत कोरम अपूर्ण असतांना पुढील दिनाकामध्ये सभा न घेता आपल्या अधिकाराचा दुरुपयोग गैर वापर करून आपले मर्जीतील सदस्यांना त्याच दिवशी बोलावून बेकायदेशीर ठराव संमत करवून घेतला गेला आहे. याबाबत मु. का. अ. जि. प. चंद्रपूर यांचेकडे बकीर बाजार लिलावात ग्राम पंचायत, टेमुर्डाने घोटाळा केला. अशा आरोपाची तक्रार मुजम्मीन मजीद शेख राह. कर्मवीर वार्ड, वरोरा यांनी सन २०२५ – २०२६ बाबत लेखी तक्रार केलेली आहे. तसेच Proseding जेव्हा च्या तेव्हा न लिहिता सदस्यांना विश्वासात न घेता केवळ उपस्थिती म्हणून सही घेऊन मासिक सभेत झालेल्या विषयांची Proseding ला नोंद न घेता आपले मर्जीने ठराव लिहून जमा खर्चास मंजुरी देऊन अधिकची बिले काढली गेली आहे.

ग्रामविकास अधिकारी पी. एल. बोरचाटे व सरपंचा सौ. सुचिता ठाकरे हे दोघेही आर्थिक गैर व्यवहाराबाबत व्यक्तीशः स्वतः जबाबदार असून याबाबत तक्राराची गंभीरता लक्ष्यात घेऊन संबंधितांवर विभागीय चौकशी करून करावाई करावी अन्यथा यांच्या विरोधात संपूर्ण गावकऱ्यांना घरून आंदोलन करू असा इशारा तक्रारीतून देण्यात आला आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here