Home चंद्रपूर क्राईम :- यवतमाळ येथील आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यावर एसीबी ची कारवाई.

क्राईम :- यवतमाळ येथील आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यावर एसीबी ची कारवाई.

चंद्रपूरच्या आरटीओ किरण मोरे व आंनद मेश्राम वर पण होणार का एसीबी ची कारवाई ? अनेकांची याबाबत तक्रारी ची तयारी?

RTO चा पंचनामा भाग -18

पुसद येथील शिकाऊ आणि कायम वाहन परवाना देण्याकरिता अधिकृत शासकीय चलनाच्या व्यतिरिक्त 200 रुपये प्रमाणे 10 क्लासेसकडून एकूण दोन हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याने यवतमाळ येथील आरटीओतील सुरज गोपाल बाहीते, मयुर सुधाकर मेहकरे, बिभिषण शिवाजी जाधव या लाचखोर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना खासगी एजंटला पैसे देतांना एसीबीने रंगेहात पकडल्याची कारवाई पुसद येथे आरटीओ कॅम्प परिसरात करण्यात आली. बलदेव नारायण राठोड, रा. वाशिम असे लाच स्वीकारणाऱ्या खासगी एजंटचे नाव असून चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुद्धा अशाच प्रकारे दररोज लाच मागितली जातं असतांना या सर्व भ्रष्टाचाराचा मोरक्या किरण मोरे व आनंद मेश्राम यांच्यावर कारवाई का नाही हा मोठा प्रश्न निर्माण होतं आहें.

चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा “RTO चा पंचनामा” या सदरात भूमिपुत्राची हाक या न्यूज पोर्टल वर प्रकाशित करण्यात येत असतांना सुद्धा परिवान मंत्री प्रताप सरनाईक यांनी किरण मोरे व आनंद मेश्राम यांचे भ्रष्टाचाराचे प्रताप काही थांबावले नाही, दरम्यान विधिमंडळात आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदाचा पदभार ज्या किरण मोरे यांना दिला त्यांना त्या पदावरून हटवाव चांगला प्रादेशिक परिवहन अधिकारी द्या अशी मागणी केली होती, मात्र कार्यालयातील लायसन्स सह इतर कामकाजातुन मिळणारे कमिशन व दरमहा जवळपास जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट कंपन्या व सिमा नाक्यावरची होणारी वसुली यातून 8 कोटी ची माया जमा होतं असल्याने व त्यातून काही हिस्सा वरपर्यंत किरण मोरे पाठवत असल्याने त्यांचेवर कारवाई होतं नसल्याची माहिती असून याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या मुंबई पदाधिकाऱ्यांनी परिवहन आयुक्त यांच्याशी भेट घेऊन चंद्रपूर चा सोक्षमोक्ष लावण्याचा चंग बांधला असल्याचे बोलल्या जातं असून लवकरच हा पंचनामा होणार आहें.

चंद्रपूर मध्ये सुद्धा अनेक ड्रायविंग स्कुल कडून वसुली?

पुसद येथील लायसन्स कँपदरम्यान आरटीओ अधिकारी लाचेची मागणी करतात अशी तक्रार सरकार मान्य ड्रायव्हिंग स्कूलच्या एका महिला संचालिकेने 7 मे 2025 रोजी केली होती. ही लेखी तक्रार यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने कारवाई करत या तीनही अधिकाऱ्यांना रंगेहात पकडलं. याप्रकरणी वसंतनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हीच पद्धत चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरु असून इथे सुद्धा लाच घेण्याचा बाजार दररोज भरतो मात्र हा बाजार कोण उठवेल याचा शोध सुरु असून या प्रादेशिक परिवहन कार्यालयात जे जे कार्यालयीन एजंट आहेत त्यांचा पंचनामा सुद्धा लवकरच सुरु होणार आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here