सरदार व शेतकरी दानव यांची ऑडिओ व्हायरलं. कायद्यानुसार शेतकरी नसलेल्या व्यक्तीला शेतकऱ्यांची शेतजमीन विकत घेता येत नाही.
पण भ्रष्टाचारी तहसील प्रशासन सावकार असलेल्या सरदार च्या नावाने सातबारा करण्यास उतावीळ का?
वरोरा:-
पैसे कमाविण्याच्या नादात शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले वरोरा येथील तहसीलदार कौटकर व त्यांच्या अधीनस्त असणारे नायब तहसीलदार मंडळ अधिकारी, तलाठी यांनी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सावकाराने अल्पशा व्याजाच्या पैशात गिळंकृत केल्यानंतर त्या जमिनीचे सातबारे सावकाराच्या नावावर करून पैसा कमावला मात्र बिचारे पिडीत शेतकरी हवालदील होऊन आत्महत्त्या कारण्याच्या उंबरठ्यावर पोहचले आणि न्यायालयाचे दरवाजे ते झिजवत आहें मात्र निष्ठुर व भ्रष्टाचारी तहसीलदार यांच्यावर मात्र कारवाई होतं नाही ही शोकांतिका आहें, मात्र या प्रकरणात ज्या सरदार ने जमीन विक्री केली तो शेतकऱ्याला जमीन परत करतो असे म्हणत असतांना व कायद्यानुसार शेतकरी नसलेल्या व्यक्तीला शेतकऱ्यांची शेतजमीन विकत घेता येत नाही असे स्पष्ट कायाद्यात असतांना सुद्धा तहसीलदार कौटकर कुठल्या नियमांने सातबारा फेरफार करत आहें व तो फेरफार करा असा आदेश तलाठी यांना देण्यास ते उतावीळ का? याचे उत्तर लवकरच समोर येणार असून सरदार याने शेतकरी दानव यांच्या सोबत केलेल्या कित्तेक ऑडिओ व्हायरलं झाल्यानंतर सरदार चा भांडाफोड होणार आहें.
तहसीलदार कौटकर यांच्या कार्यकाळात अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सावकारांच्या घशात गेल्या् असून पिडीत शेतकरी श्रीकृष्ण दानव यांनी सातबारा फेरफार प्रकरणी आक्षेप अर्जात नमूद केलं की सरदार कडून मला एकही रुपया मिळाला नाही व धमकी देऊन रजिष्ट्री करण्यात आली, मात्र ज्या सरदार ने ऑडिओ मध्ये म्हटले की तुझी शेतजमीन तुला परत करतो त्या सरदार ने तहसीलदार यांना पैशाचा नैवेद दाखवला आणि तहसीलदार यांनी सरदार च्या नावाने फेरफार करण्याचे आदेश तलाठी यांना दिले याची चौकशी पण व्हायला हवी याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे लोकायुक्त यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहें.
कसे शेतकऱ्यांच्या पाठीत तहसील प्रशासन खंजीर खुपसतात?
मागील 2023.24 च्या दरम्यान उत्तम चिंचोलकर यांचे मौजा बांद्रा येथील सर्व्हे क्रमांक 79/4 या शेतीचे सावकारी प्रकरण जिल्हा उपनिबंधक कार्यालय चंद्रपूर येथे न्यायप्रविष्ट असतांना व त्या अगोदर सावकारा कडून फेरफार करण्याचे अर्ज तलाठी व मंडळ अधिकारी यांनी नामंजूर केले असतांना तहसीलदार कौटकर यांनी विजय भोले या सावकारांकडून पैसे घेऊन बेकायदेशीर फेरफार घेतले व सावकाराच्या नावावर शेती केली, आता सुद्धा तसाच प्रकार सुरु असून श्रीकृष्ण बालाजी दानव वय ३० वर्ष राहणार रा. जामणो बुज. ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर याची मौजा सामणी भूमापन क्रमांक २७/४ व आराजी ०.८१ हो शेती दुय्यम निबंधक यांनी पैसे घेऊन बेकायदेशीर विक्री केली, ही विक्री पुन्हा अवैध सावकार रोहित चंद्रशेखर दुर्गे यांच्याकडून १,२५,०००/- रुपये व्याजाने घेण्याच्या मोबदल्यात मनमोहन सिंग गुरुदयाल सिंग दिगवा याला विक्री करण्यात आली, दरम्यान श्रीकृष्ण बालाजी दानव या शेतकऱ्यांनी सावकार दुर्गे यांचे सावकारी व्याजासह पैसे परत केल्यानंतर सुद्धा ती शेती परत न करता त्या शेतीचा सातबारा अवैध सावकार मनमोहन सिंग गुरुदयाल सिंग दिगवा याचे नावावर करून देण्यास आक्षेप घेतल्यानंतर सुद्धा तहसीलदार कौटकर यांच्या आदेशाने नायब तहसीलदार गिरीश बोरडे हे सावकारांकडून पैसे घेऊन फेरफार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्वतः पिडीत शेतकरी श्रीकृष्ण बालाजी दानव यानी दिली
काय आहें कायदा?
कायाद्यानुसार शेतकऱ्यांची शेतजमीन ही शेतकरीच घेऊ शकतो, ज्यांच्या नावाने शेती नाही व तो शेतकरी असल्याचा पुराचा दाखवत नाही त्याला कुठल्याही शेतकऱ्यांची शेतजमीन विकत घेता येत नाही पण तहसीलदार व दुय्यम निबंधक हे शासनाचे अधिकारी असून सुद्धा केवळ पैसे कामाविण्यासाठी कायाद्याचा भंग करत आहें. मात्र त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब व शेतकरी बळी पडत आहें, कारण हे पैसे देणाऱ्यांची बाजू घेतात व गरिबावर अन्याय करतात असे अनेक प्रकार दुय्यम निबंधक जिवने व तहसीलदार कौटकर करत असल्याने यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी मनसे कडून करण्यात आली आहें.