ब्रम्हपुरीत पहिलेच शिवभोजन केंद्र. या शिवभोजनाच्या गरजू गरीब कुटुंबातील व्यक्तींनी लाभ घ्यावा, पालकमंत्र्यांचे आव्हान!
चंद्रपूर- प्रतिनिधी :-
शिवभोजन योजना ही महाराष्ट्र शासनाची राज्यातील गोर गरीब नागरिकांसाठी कमी दरात भोजन सेवा उपलब्ध करून देणारी महत्वाकांक्षी योजना आहे.या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरीत गरजवंत नागरिकाला किफायशीर दरात भोजनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन दिनांक 4 एप्रिलला दिनेश बोभटकर, झाशी राणी चौक ब्रम्हपुरी येथे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
कोरोना या घातक विषाणूने संपूर्ण देशाला हवालदिल केले आहे.अशा परिस्थितीत गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी गरजू नागरिकांना शिवभोजन थाळी केंद्रातून अवघ्या 5 रुपये या माफक दरात पोटभर जेवण मिळणार आहे. याचा गरजूंनी लाभ घ्यावा.असे आवाहन पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, पोलीस उपविभागीय अधिकारी मिलींद शिंदे, तहसीलदार विजय पवार, मुख्याधिकारी वासेकर आदी उपस्थित होते. दरम्यान पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनीही शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.
या शिवभोजन केंद्रातून दिवसाला 100 थाळी वितरित होणार असून याचा गरजवंतानी लाभ घ्यावा, असे सांगताना पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागु करण्यात आली आहे. यामुळे हॉटेल सेवा बंद आहे.याशिवाय कोणतीही अन्य भोजन सेवा उपलब्ध नाही. मोल मजुरीसाठी बाहेरून कामासाठी जिल्ह्यात आलेले मजूर, झोपडपट्टीत राहणारे नागरिक यांना अशा परीस्थितीत जेवणाची सोय करण्यास अडचण होत आहे.अशाच कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांना घरा बाहेर पडून अन्न मिळवणे जिकिराचे होत असल्याने या सर्वांनी सामाजिक अंतर राखून शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी केले.
ब्रम्हपुरी येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यात आले आहे.ही थाळी अवघ्या 5 रुपयात मिळणार असल्याचे सांगत पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार म्हणाले,कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ 5 रुपयांमध्ये ग्राहकांना भोजन उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला.या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने 5 रुपये या सवलतीच्या दराने थाळी वितरित केली जाणार आहे.
संचारबंदीचा फटका कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांना बसत आहे . त्यामुळे आता ब्रम्हपुरीत शिवभोजन थाळी केंद्राचा प्रारंभ झाल्याने अशा वंचीत घटकांची गैरसोय टळणार असल्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं .