कोरोना अपडेट :-
सारे जग कोरोनामुळे “बंदिस्त” असतांनाही जपान “शांत” कसा? चीनमधुन जपानमध्ये “डायमंड प्रिन्सेस” हे जहाज जानेवारी महिन्यात येऊनही जपान हे पहिले कोरोनाबाधित राष्ट्र झाले असतांना देखील कोरोना हा इतर युरोपियन राष्ट्रांप्रमाणे चौथ्या टप्प्यात कां पोचला नाही, हे अनेकांना पाडलेले कोडे आहे! विशेष म्हणजे जपान विज्ञानाचा स्विकार करतात अज्ञानाचा नाही.
भारतीय विद्यार्थ्यांचा जपान मधील अनुभव ! खालीलप्रमाणे !
ज्यावेळी जपानमध्ये कोरोनाविषाणू हल्ला झाल्याचे कळले त्यावेळी माझ्या आईवडिलांनी मला त्वरीत भारतात येऊन तेथील परिस्थिती निवळल्यावर मग परत जाण्याच्या सुचना दिल्या. परंतु जपानमध्ये आजही सर्वकाही आलबेल आहे.आम्ही रोज आॅफिसला जातो.
सर्व अत्यावश्यक सेवा पुरवठा केंद्राला भेट देतो.
कुठलेही उपहारगृह बंद नाही! कुठलेही माॅल बंद नाही.
मेट्रो रेल्वे चालू आहे. बुलेट ट्रेन धावताहेत!
कुठलाही लाॅक डाऊन नाही! सर्व आंतरराष्ट्रीय सिमा खुल्या आहेत.
जपानमध्ये वृध्दांचे प्रमाण इटलीपेक्षा जास्त आहे.
टोकीयोत परदेशी लोकांचे वास्तव्य सगळ्यात जास्त आहे व ते पर्यटकांचे आवडते शहर आहे.तेथे परदेशी प्रवाशांना बंदी नाही. फक्त शैक्षणिक सेवा व सार्वजनिक उपक्रमांवर बंदी आहे!
कोरोना विषाणू साखळी बंद करण्याविषयी थिअरीचा मी अभ्यास करत आहे. लाॅक डाऊन मुळे भारतासारख्या दाट लोकवस्तीच्या देशात कोरोना विषाणू साखळी बंद केली जाते. परंतु टोकियो सारख्या दाट वस्तीत मात्र लाॅक डाऊन शिवाय सारे काही सुरळीत चालू आहे व नियंत्रणात आहे!मला भारतातील बातम्यांमुळे व सततच्या परिस्थितीमुळे भिति वाटते!
मी यांचे खालीलप्रमाणे विश्लेषण केले आहे.
*जपानी संस्कृतीत लहानपणापासून दिलेल्या शिस्तीच्या बाळकडूमुळे कोरोनाप्रतिबंधक नियम आपोआप पाळले जात आहेत!*जपानी प्रवासाला बाहेर पडताना चे मास्क घालतात. ६०%जपानी नेहमी मास्क घालुन बाहेर पडतात. थोडी सर्दी झाली तरी ते मास्क लावतात.
त्यांच्या या संस्कृतीमुळेच कोरोनाविषाणू साखळी खंडीत होत आहे. *जपानमध्ये स्वागतकक्षातील लोक,नर्स, डॉक्टर,सरकारी अधिकारी,स्टेशनमास्तर, रेल्वे कर्मचारी वर्ग नेहमी मास्क वापरतात. *हिवाळ्यात मुलं सर्दी होऊ नये म्हणून मास्क लावतात. जपानमध्ये घरोघरी कोडोमो मास्कची पेटी असते. कोडोमो मास्क लहान मुलांना फीट बसतो.
जपानी जीवनपध्दतीत आपल्या सवयींमुळे इतरांना ऊपद्रव होणार नाही,याची काळजी घेतली जाते.
ते कुठेही थुंकत नाही,खोकत नाही,शिंकरत नाही. स्वच्छता हा त्यांच्या संस्कृतिचा एक भाग आहे.
शाळेतच त्यांना बाराखडी शिकविण्याआधी सार्वजनिक स्वच्छता व आदर्श नागरीकतेचे धडे शिकवले जातात.
*ते हस्तांदोलन न करता वाकुन स्वागत करतात!
हात धूणे हा त्यांच्या संस्कृतिचा एक भाग आहे.सार्वजनिक स्वच्छतागृहात, कार्यालयात प्रवेश करण्याचे जागी स्वच्छके वापरली जातात.
विश्रांतीगृहात स्वच्छकाने हात धुवून सिंक स्वच्छ केले जाते जेणेकरून नंतर वापरणारया व्यक्तीस ते सुस्थितीत मिळावे. हे मेट्रो स्टेशनमध्ये नेहमी पहायला मिळते.
जपानी लोक नेहमी ओला रुमाल हात पुसण्यासाठी सोबत बाळगतात.
सोशल डिस्टंसींग (चार हात दुर)ते पुर्वीपासूनच ठेवत आले आहेत. ही एक साधनाच आहे!
*कोरोनाप्रसारावर नियंत्रण ठेवण्यात बनविलेले नियम हे त्यांच्या जीवनपध्दती व संस्कृतिचा भाग आहेत.
या सर्व गोष्टींमुळेच कोरोनाप्रसारावर नियंत्रण ठेवण्यात जपानला यश मिळाले आहे!
जपानपासुन एवढे शिकलो तरी पुरे!
कारण जपान हे बौद्ध राष्ट्र आहे आणि ते विज्ञानाचा स्विकार करतात
अज्ञानाचा नाही.