Home चंद्रपूर सर्व्हेक्षण :- चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात कोण मारणार बाजी?

सर्व्हेक्षण :- चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात कोण मारणार बाजी?

सर्वाचे राजकीय भविष्य इव्हिएम मशीन मध्ये कैद, झालेल्या मतदानातून पुढे आला सटीक सर्वे आणि हे होणार आमदार.

चंद्रपूर :-

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव टाकणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व पालकमंत्री सुधीर मुंगनटीवर या दोन नेत्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून आहे, राजकारणात आल्यापासून कधीही पराजय न बघणारे व विपरीत परिस्थितीत सुद्धा आपला विजयी रथ पुढे नेणारे विजय वडेट्टीवार हे यावेळी सुद्धा निवडून येतील असा अंदाज ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात वर्तवल्या जात आहे तर दिसरीकडे पालकमंत्री सुधीर मुंगनटीवर यांच्या विरोधात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत आणि अपक्ष उमेदवार डॉ अभिलाषा गावतुरे यांनी मोठे आव्हान उभे केले होते तरीही सशक्त संघटन आणि विकासाचा झंजावत यामुळे पालकमंत्री सुधीर मुंगनटीवर हे निश्चितपणे निवडून येतील असा अंदाज सर्व्हे मध्ये वर्तवला जात आहे.

जिल्ह्यात झालेले मतदान टक्केवारीत असे आहे, राजुरा -72.71 चंद्रपूर – 57.98, बल्लारपूर -69.70 ब्रम्हपुरी -80.54, चिमूर -81.75, वरोरा -69.48, यावरून कोण कुठे प्रभावी आहेत हे कळत नसलं तरी ज्यावेळी मतदान जास्त होत असतें तेंव्हा परिवर्तन ठरलं असतें यावरून ब्रम्हपुरी व चिमूर मध्ये काट्याची टक्कर आहे पण यात विजय वडेट्टीवार यांचा विजयी रथ भाजप उमेदवार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कृष्णलाल सहारे he अडवू शकणार नाही अशी परिस्थिती आहे मात्र चिमूर येथे झालेले रेकॉर्डब्रेक मतदान हे भाजप उमेदवार बंटी भांगाडिया यांना धोक्याची घंटा असून कांग्रेस चे अविनाश वाजूरकर हे येथे निवडून येईल अशी शक्यता आहे,

राजुरा विधानसभा क्षेत्रात सुद्धा आदिवासी दुर्गम भाग असतांना 72.71 टक्के मतदान झाले, मात्र या क्षेत्रात चौरंगी लढत होतांना दिसत आहे यामध्ये कांग्रेस सुभाष धोटे व तिसऱ्या आघाडीचे उमेदवार वामनराव चटप यांच्यात जोरदार लढत होतांना दिसत आहे, मागील निवडणुकीत अगदी 17 व्या फेरीपर्यंत पुढे असणारे वामनराव चटप यांचा 2000 हजार मतांनी सुभाष धोटे यांनी पराभव केला होता, मात्र आता वामनराव चटप अशाच अटीतटीत 2 ते 3 हजार मतांनी निवडून येतील असा अंदाज आहे.

चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत सर्वात कमी मतदान झाले आहे मात्र याचा फटका सत्ताधारी भाजप उमेदवार किशोर जोरगेवारं यांना होण्याची चिन्हे दिसत आहे, कारण अपक्ष उमेदवार ब्रुजभूषण पाझारे यांना भाजप कार्यकर्ते यांनी सहकार्य केल्याने व त्यांच्याविषयी असणारी सहानुभूती यामुळे भाजप ची मते ज्या प्रमाणे मागील निवडणुकीत अपक्ष असणाऱ्या जोरगेवार यांना गेली तशी यावेळी पाझारे यांना गेली असल्याचे बोलल्या जात आहे, या दरम्यान कांग्रेस उमेदवार प्रवीण पडवेकर यांच्यासाठी कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व महाविकास आघाडी घटक पक्षातील नेते एकवटले असल्याने शिवाय दलित व मुस्लिम समाज यांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने प्रवीण पडवेकर हे निवडून येण्याची शक्यता बळावली आहे.

वरोरा विधानसभा मतदार संघात पंचरंगी होणारी निवडणूक सरतेशेवटी तिरंगी लढतीत परवार्तीत झाली, त्यात भाजप उमेदवार करण देवतळे यांनी आघाडी घेतली तर अपक्ष उमेदवार मुकेश जीवतोडे यांनी जोरदार लढत दिली, मात्र कांग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्या सोबत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मोठी ताकत ऐन शेवटच्या दोन दिवसात व मतदानाच्या शेवटच्या तासापर्यंत लावल्याने मुकेश जीवतोडे यांना फटका बसलेला आहे दरम्यान भाजप उमेदवार करण देवतळे हे येथे निवडून येण्याची शक्यता वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here