लोकशाहीचा महाउत्सव ; चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किशोर जोरगेवार यांनी मानले आभार….
चंद्रपूर :- चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवार किशोर जोरगेवार यांनी आपल्या समर्थनासाठी सन्माननीय मतदारांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. त्यांनी एका दिलखुलास संदेशात लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभाग घेणाऱ्या प्रत्येक मतदार, कार्यकर्ता आणि सहकार्यांचे त्यांचे आभार व्यक्त केले.
News reporter :- अतुल दिघाडे
किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, “लोकशाही ही देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि मतदारांचे योगदान यामध्ये अनमोल आहे. प्रत्येक मतदाराचे हक्क जपणारे, त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारे एक सक्षम नेतृत्व निर्माण करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील.”
त्यांनी पुढे म्हटले की, “चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या सर्व विकासात्मक समस्या आणि आव्हानांचा सामना एकत्र करून अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगत चंद्रपूर घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आपल्या मतांच्या सामर्थ्यावर आणि आपली विश्वास ठेवून, आपण मिळवनाऱ्या विजयाच्या माध्यमातून समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत सकारात्मक बदल पोहचवण्यासाठी मी वचनबद्ध आहे.” अशे सांगत किशोर जोरगेवार यांने आभार व्यक्त केले आहे,