चंद्रपूरमध्ये किशोर जोरगेवार यांच्या विजयाची चर्चा: भाजपाचे उमेदवार किशोर जोरगेवार यांची विजयाची दिशा निश्चित!
चंद्रपूर :- आज चंद्रपूर शहरात झालेल्या मतदानानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे भाजपाचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांचा विजय निश्चित आहे. मतदान प्रक्रियेनंतर शहरातील प्रत्येक चौकात आणि गल्लीत नागरिकांचा प्रतिसाद पाहता, त्यांच्या विजयावर शंका घेणारा एकही आवाज नाही.
News reporter :- अतुल दिघाडे
चंद्रपूरातील प्रत्येक बूथवर आणि लोकांच्या मनामध्ये किशोर जोरगेवार यांच्या उमेदवारीची चर्चा अत्यंत जोरात सुरू आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेतला आहे आणि त्यांची कामगिरी नेहमीच सकारात्मक राहिली आहे. यामुळेच त्यांना चंद्रपूरच्या जनता कडून प्रचंड समर्थन मिळाल्याचे दिसून येत आहे.
विरोधकांपेक्षा भाजपा ने त्याच्या उमेदवार किशोर जोरगेवार यांना अधिक लोकप्रियता मिळवून दिली आहे. मतदानाच्या सुरुवातीच्या आकड्यांवरूनच असं दिसून येतं की, यावेळी भाजपाच्या विजयाची लाट चंद्रपूरमध्ये गाजत आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांसोबतच, सामान्य नागरिकही जोरगेवार यांना त्यांची सेवा आणि कार्यक्षमतेसाठी एकमताने समर्थन देत आहेत.
किशोर जोरगेवार यांचे नेतृत्व आणि त्यांची लोकांशी असलेली जवळीक यामुळे चंद्रपूरच्या राजकारणात एक नवा बदल येणार असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. त्यांच्या विजयामुळे भाजपाला इथं एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आता केवळ निवडणूक निकालाचीच प्रतीक्षा आहे, परंतु चंद्रपूर शहरातील वातावरण आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहता, किशोर जोरगेवार यांचा विजय अगदी स्पष्ट दिसत आहे.