चंद्रपूर जिल्ह्यातील पद्मश्री बाबा आमटे यांच्या आनंदवन संस्थेचे सर्वत्र अभिनंदन !
वरोरा प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन हे अख्ख्या भारतात प्रशीद्ध असून सामाजिक कार्यात आणि राष्ट्रीय कार्यात आनंदवनचा प्रमुख सहभाग राहिला आहे. देशात पहिल्यांदा श्रधेय बाबा आमटे यांनी भारत जोडो अभियान चालविले होते. व आता राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या संकट काळात त्यांनी मदतीचा हात समोर केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना सॅनिटायझर आणि फेसमास्क वापरण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. मात्र गेल्या काही दिवसात वैद्यकीय कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यानाच याचा तुटवडा जाणवत आहे.
ही बाब लक्षात घेता राज्यतील अनेक ठिकाणी फेसमास्क बनविण्यात येत आहेत. राज्यतील तुरुंगातील कैद्यांकडून मास्क बनविले जात आहेत. तर दुसरीकडे आता कोरोनाविरोधात लढण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची तिसरी पिढी देखील सज्ज झाली आहे. बाबा आमटेंच्या कुष्ठरोग्यांसाठी असलेल्या आनंदवन या संस्थेकडून आता कापडाची थ्री लेयर मास्क निर्मिती सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी ही संस्था पर्यावरणपूरक कापडाच्या मास्कसह, संपूर्ण चेहरा झाकण्यासाठीचे फेस शील्ड तयार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे मास्क आनंदवनमधील मूकबधिर, कुष्ठरोगी, मानसिक रुग्ण असे दिव्यांग व्यक्ती तयार करत असून हे पूर्णपणे मोफत संस्थेकडून दिले जात आहेत.
आनंदवनच्या डॉ. शीतल आमटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून आनंदवनकडे 40,000 मास्कची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी 3600 मास्क बनवून तयार आहेत, तर 1390 मास्क वाटण्यातही आले आहेत. याशिवाय मास्कच्या निर्जुंतिकीकरणासाठी देखील दोन खास पाऊच बनवले जात आहेत. संस्थेच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी आणि आनंदवन या दोन प्रकल्पांमध्ये प्रतिबंधात्मक सुरक्षा साधनांची निर्मिती केली जात आहे”, असे सांगितले.
तर, किमान संसर्ग रोखू शकेल असे जाड आणि श्वास घेण्यासही सोयीस्कर असेल अशा फॅब्रिकचा वापर मास्क बनविण्यासाठी केला आहे. हे फॅब्रिक आनंदवनमधील पॉवरलूममध्ये काढलेले आहे. विशेष म्हणजे हे मास्क आनंदवनमधील मूकबधिर, कुष्ठरोगी, मानसिक रुग्ण असे दिव्यांग व्यक्ती तयार करत असून हे पूर्णपणे मोफत संस्थेकडून दिले जात आहेत.असे लोकबिरादरी प्रकल्पाच्या डॉ.अनघा आमटे यांनी सांगितले.