विविध स्पर्धांच्या बक्षिस वितरणाने श्री माता महाकाली क्रीडा महोत्सावाचा समारोप
चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर:- चंद्रपूरकर हा इतिहास घडवीत असतो. श्री माता महाकालीची ऐतीहासीक अशी भव्य पालकी आपण काडली. आता श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव घेत विविध १० ठिकाणी 21 प्रकारच्या खेळांचे यशस्वी आयोजन आपण पार पाडले आहे. यात पाच हजार खेळाडू सहभागी झाले होते. हा विक्रम आहे. मात्र हे क्रीडा महोत्सव केवळ विक्रमासाठी किव्हा मनोरंजनापूरते सिमीत न राहता यातुन आपण जिल्ह्यातील उत्तम खेळाडूंचे टिपन करुन त्यांना आंतरराष्ट्रिय दर्जाचे प्रशिक्षण दिले पाहिजे. यात शक्य ती सर्व मदत आम्ही करणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आयोजित सहा दिवसीय श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचा काल रविवारी विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाने समारोप करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. या सर्व कार्यक्रमांना जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्यासह विविध क्रीडा असोशिएशनच्या पदाधिका-र्यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले की, माता महाकाली ही आमची आराध्य दैवत आहे. असे असतांना आमच्या दैवताची महती एका चौकटीत सीमित राहु नये. मातेच्या महतीचा, दैवी शक्तीचा, येथील गोंडकालीन शिल्पकलेचा प्रचार प्रसार आपल्याला राज्यातच नवे तर देशात पोहचवायचा आहे. त्यामुळे आपण आमदार चषकाला श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे नाव दिले. कदाचीत या नावातील शक्तीमुळेच आम्ही पाच हजार खेळाडंूची उत्तम व्यवस्था करु शकलो. यातील जवळपास तिन हजार खेळाडू हे सहा दिवस निवासी होते. त्यांनाही आपण उत्तम अशी व्यवस्था उपलब्ध करुन दिली. हे खेळाडू जेव्हा आप – आपल्या जिल्हात परत जाऊन त्यांना येथे मिळालेल्या मान, सन्मान आणि उत्तम व्यवस्थेबाबत आयोजनाचे कौतुक करतील तेव्हा नक्कीच चंद्रपूरचा गौरव वाढणार आहे.
या क्रीडा महोत्सवातुन जिल्ह्याची क्रीडा क्षेत्रातील एक नवी ओळख आम्ही महाराष्ट्राला दाखवून दिली आहे. आजवर चंद्रपूरचा खेळाडू मुंबई, पुणे, ठाणे या जिल्ह्यात खेळायला जायचा आपण ही परंपरा बदलवली आहे. आज मुंबई, ठाणे, पुणे या जिल्हातील संघ चंद्रपूरात खेळण्यासाठी आले आहे. येथील व्यवस्था पाहुन ते आता प्रत्येक वर्षी या क्रीडा महोत्सवात सहभागी होतील. या क्रीडा महोत्सवातुन चंद्रपूरच्या खेळाडूंना राज्यातील नांमाकीत खेळाडूंचा खेळ पाहण्याची आणि त्यांच्यासोबत खेळण्याची संधी उपलब्ध झाली. चंद्रपूरातील खेळाडूंनीही अनेक खेळात मोठे यश मिळविले.
तयार होत असलेल्या या सर्व उत्तम खेळाडंुचे आपण टिपन केले पाहिजे. त्यांना उत्तम प्रशिक्षण दिले पाहिजे. यासाठी मोठ्या प्रशिक्षकाची गरज असल्यास तो आपण उपलब्ध करुन देऊ, या जिल्हातील खेळाडू हा आंतराष्ट्रीय पातळीवर खेळावा हा संकल्प आम्ही केला आहे. यासाठी उपलब्ध असलेल्या मैदानांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातील. तर काही नवीन मैदाने आपण चंद्रपूरात तयार करु. हे काम कठीण वाटत असले तरी अशक्य नक्कीच नाही. फक्त खेळाडुंनी पूढे यावे त्यांना लागणारी प्रत्येक आवश्यक गोष्ट आम्ही उपलब्ध करुन देऊ असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. सदर आयोजनात चंद्रपूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन, चंद्रपूर जिल्हा बॅटमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशन, डेव्हलपमेंट अॅन्ड रिसर्च एजुकेशन मल्टीपर्पज सोसायटी, जय श्रीराम क्रीडा युवक व व्यायम प्रसारक मंडळ, चंद्रपूर जिल्हा एम्यूचर अॅथलेटिक्स असोशिएशन, मथुरा बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर, स्विमिंग असोशिएशन आॅफ चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा स्केटींग असोशिएशन, चंद्रपूर जिल्हा नेटबाॅल असोशिएशन, जिल्हा बाॅसकेटबाॅल असोशिएशन, चंद्रपूर जिल्हा चेस एन्ड रॅपिट असोसिएशन, चंद्रपूर जिल्हा हाॅकी असोशिएशन, नेताजी सुभाष क्रीडा मंडळ यांच्यासह इतर क्रीडा संस्थाचे सहकार्य लाभले. विविध ठिकाणी आयोजीत या क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमात प्रा. श्याम हेडाऊ, मोंटु सिंग, नासीर खान, नौशाद सिध्दीकी, प्रज्ञा जिवनकर, सरोज चांदेकर, दिलीप मुंजेवार आदिंनी संचालनाची सुत्र उत्तमरित्या सांभाळली. या महोत्सवासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या सर्व आघाडींनी परिश्रम घेतले.