Home चंद्रपूर …..तर भाजप महामंत्री रवि गुरनुले यांची धिंड काढणार ?

…..तर भाजप महामंत्री रवि गुरनुले यांची धिंड काढणार ?

संतप्त गणेश भक्त व शिवप्रेमी महिलांनी दिला इशारा, भाजपच्या धोरणाला पायदळी तुडवून हिंदू धर्माचे मंदिर तोडण्याची भाषा करणाऱ्या गुरनुलेवर होणार का कारवाई ?

चंद्रपूर ;-

भारतीय जनता पक्ष हा हिंदू धर्म व हिंदू देवीदेवतांच्या रक्षणासाठी लढणारा पक्ष म्हणून सर्वपरिचित असताना त्याच पक्षाचे माजी नगरसेवक व पक्षाचे महामंत्री रवि गुरनुले यांनी चक्क गणेश व शंकराचे मंदिर उध्वस्त करण्याची धमकी सार्वजनिकरीत्या मंदिर उभारणाऱ्या महिलांना दिल्याने भाजपचे हेच का बेगडी हिंदुत्व? असा प्रश्न उपस्थित करून जर मंदिर उध्वस केले तर आम्ही रवि गुरनुले यांची धिंड काढू असा इशारा गणेश भक्त व शिवप्रेमी महिलांनी दिला आहे, अर्थात धार्मिक वादात भाजप चे वरिष्ठ पदाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चंद्रपूर शहरातील तुकुम भागातील बियाणी पेट्रोल पंपच्या मागे सी,जी पटेल यांची सर्वे क्रमांक 27 आराजी 60 आर मालकीची जागा आहे, त्या जागेवरून कत्तल खाण्याकडे जाणारी जनावरे चोरीच्या मार्गाने नेणे, वेस्ट मटेरिअल ची विल्हेवाट लावणे, सिटिपिएस करिता वॅगनद्वारा येणारा कोळसा चोरी करून त्याचा साठा करणे व भंगार चोरी करून इथे लपवून ठेवणे याकरिता या जागेचा वापर होतं असल्याने या सर्व अवैध धंद्यांना आळा बसावा म्हणून पटेल यांनी आपल्यां हद्दीत असलेल्या जागेवर वॉल कंपाऊंड करून काही जागा या भागातील घरे असणाऱ्या रहिवाशांना सार्वजनिक उपक्रम व ये-जा करण्यासाठी सोडून दिली होती, दरम्यान या भागाचे माजी नगरसेवक व भाजप महामंत्री रवि गुरनुले यांनी या ठिकाणी असणाऱ्या अवैध धंदे करणाऱ्यांची बाजू घेत येथील रहिवासी महिलांनी पूजाअर्चा करण्यासाठी छोटेखानी बांधलेल्या गणेश मूर्ती व  शिव पिंडची स्थापना केलेल्या मंदिराला उध्वस्त करून अवैध धंद्याला चालना देण्यासाठी  रस्ता  बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे दरम्यान या मंदिर परिसरातील महिलांनी रवि गुरनुले यांचे घर गाठून त्यांना विचारणा केली की आम्हच्या मंदिराला का विरोध करताहेत तर त्यांवर त्यांनी तुम्ही महानगरपालिका जागेवर बेकायदेशीर मंदिर बांधले असून मी आयुक्तांना सांगून ते मंदिर तोडायला लावत आहे अशी धमकी दिली. या दरम्यान महिला सुद्धा आक्रमक होऊन त्यांनी पण इशारा दिला की जर आम्हच्या मंदिराला जर उध्वस्त केले तर तुम्हची आम्ही धिंड काढू.

खरं तर हिंदूंची मंदिर रक्षण करण्याची भाजप मधे चढाओढ लागली असताना त्याच पक्षातील एक जबाबदार महामंत्री जर मंदिर तोडायची भाषा करत असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीमधे बसणारी बाब आहे का असा प्रश्न उभा ठाकला असून या संदर्भात तुकुम येथील मंदिर परिसरातील महिला हिंदू विश्व परिषद, बजरंग दल, हिंदू महासभा व भारतीय जनता पक्षाचे नेते यांच्याकडे तक्रार देणार असल्याची माहिती महिलांनी दिली असल्याने आता रवि गुरनुले यांच्यावर पक्षाकडून काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here