Home चंद्रपूर चांदा शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा जिल्हाधिकारी कार्यालय कोव्हीड-19 मधे मदत!

चांदा शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा जिल्हाधिकारी कार्यालय कोव्हीड-19 मधे मदत!

संस्थेच्या विविध शाखांतर्फे मदतकार्य सुरु !

चंद्रपुर (का.प्र.) :

कोव्हीड-19 च्या प्रादुर्भावाने देशात निर्माण झालेल्या आपात्कालीन परीस्थितीशी लढण्यासाठी देशवासी आपआपल्या परीने मदतकार्यात सहभाग नोंदवित आहे. चंद्रपुर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सामाजिक बांधीलकीचे दर्शन होत आहे. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री कोषासह जिल्हाधिकारी कोषात दानशुर व्यक्ती, संस्था आर्थीक मदत करीत आहेत.
पुर्व विदर्भातील मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या चांदा शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा व संस्थेच्या विविध शाखांतर्फे सामाजिक बांधीलकी जोपासत मागील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालय कोव्हीड-19 मदत निधीत आर्थीक मदत देण्यात आलेली आहे.
चांदा शिक्षण प्रसारक मंडळ ही एक शैक्षणीक व सामाजिक संस्था म्हणून नावारुपास आहे. या अगोदर अनेक वेळा संस्थेने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. जिल्ह्यात आलेल्या आपत्तीमधे सातत्याने मदतकार्य राबविले आहे. कोव्हीड-19 च्या प्रादुर्भावाच्या काळात सामाजिक बांधीलकी जोपासत संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालय कोव्हीड-19 मदत निधी कोषात 1,00,000 रु. मदत निधी दिला आहे. सोबतच संस्थेच्या जनता करीअर लौन्चर द्वारा 51,000 रु., जनता शासकिय-निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्था द्वारा 51,000 रु. व चांदा पब्लिक स्कूल द्वारा 51,000 रु. निधी देण्यात आलेला आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार संस्थेतील सर्व कर्मचा-यांचा एक दिवसाचा पगार या मदतनिधी कार्यात देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षकांनी या मदतकार्यात आपआपल्या परीने सहभाग नोंदवावा, व सर्वांनी घरीच सुरक्षित रहावे, व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेचे सेक्रेटरी प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे यांनी केले आहे.

Previous articleआश्चर्यच :- एक वर्षाच्या चिमूकलिचा कोरोना संदेश ! म्हणाली कोरोना आहे आईस्क्रीम नाही खायचं !
Next articleसिमेंट वाहतुकीमुळे नागरिकात दहशत अनेक गावात असंतोषाचा भडका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here