मनसेच्या महिला सेनेचा अनोखा उपक्रम शहर पोलीस स्टेशन मधे साजरा केला रक्षाबंधन.
चंद्रपूर प्रतिनिधी :-
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांच्या नेत्रूत्वात दरवर्षी रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतल्या जातो, पोलीस अधिकारी कर्मचारी व विशेषतः जिल्हा कारागृहातील कैदी बांधव यांना राखी बांधून साजरा केल्या जातो तर दुसरीकडे ज्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांच्याकडून मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्ते राखी बांधून घेऊन महाराष्ट्रच्या उज्वल संस्कृतीची जोपासना करताहेत मात्र यावर्षी कोरोना संक्रमण काळात शासनाकडून करण्यात आलेले निर्बंध पाळून अगदी थोडक्यात काही महाराष्ट्र सैनिक महिला भगिनीना घेऊन रक्षाबंधनचा कार्यक्रम शहरातील शहर पोलीस स्टेशन व रामनगर पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा कराव्यात आला. कोरोना महामारी काळात पोलीस बांधवाणी रात्र / दिवस आपली कामगिरी बजावून जनतेला सहकार्य केले याबद्दल मनसे महिला सेनेतर्फे यांचे आभार मानले
यावेळी मनसेच्या महिला सेना जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांच्यासह जिल्हा सचिव अर्चना आमटे, जिल्हा उपाध्यक शोभा वाघमारे,शहर उपाध्यक्ष प्रीती रामटेके,शहर उपाध्यक्ष वंदना वाघमारे, विभाग अध्यक्ष वर्षा भोमले, विभाग अध्यक्ष मीनाक्षी जीवने, दर्शना उत्तरवार,श्रद्धा दुधे, शहर संघटक मनोज तांबेकर, पीयूष धुपे, वर्मा
इत्यादींची उपस्तीती होती.