Home वरोरा मनसेचे उद्या तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन.

मनसेचे उद्या तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन.

 

वरोरा तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे करा.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील जीएमआर कंपनी मधे परप्रांतीय कामगारांची वैद्यकीय तपासणी केली असता ते कामगार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर सुद्धा संबंधित कंपनी व्यवस्थापनाने या संदर्भात कुठलीही उपाययोजना न करता वरोरा तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्याचा दुर्दवी प्रकार चालवलेला आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संबंधित जीएमआर कंपनी विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून परप्रांतात कामगार कंपनी मधे येण्यास स्थानिक प्रशासनाने मज्जाव करावा अशा प्रकारचे निवेदन दिले होते परंतु स्थानिक तालुका प्रशासनाने याबाबत कुठलीही कारवाई प्रशासनाने केली नाही त्यामुळे मनसेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्या नेत्रूत्वात उद्या दिनांक २३ ऑगस्ट ला एक दिवशीय धरणे आंदोलन तहसील कार्यालयासमोर उद्या होणार आहे.

या धरणे आंदोलनाला वरोरा तालुक्यातील सर्व मनसैनीक व मनसे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून परप्रांतीय कामगारांचे लाड पुरविणाऱ्या जीएमआर कंपनी व्यवस्थापनाला धडा शिकवावा असे आवाहन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे. तालुका अध्यक्ष वैभव डहाने. तालुका सचिव कल्पक ढोरे. तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी, शहर अध्यक्ष राहुल लोणारे, शहर उपाध्यक्ष कुणाल गौरकार. अजिंक्य नरडे,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष मुज्जमील शेख.तालुका अध्यक्ष अभिजित आष्टकार,तालुका उपाध्यक्ष शुभम कोहपरे.सचिन मांडवकर.शहर अध्यक्ष अनिकेत पुरी.धीरज गायकवाड, प्रितम ठाकरे, चेतन निकोडे इत्यादींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here