Home वरोरा खळबळजनक :- वरोरा विधानसभा क्षेत्रात डॉ. खुंटेमाटे यांचा मुकेश जीवतोडे यांना जाहीर...

खळबळजनक :- वरोरा विधानसभा क्षेत्रात डॉ. खुंटेमाटे यांचा मुकेश जीवतोडे यांना जाहीर पाठिंबा?

वसुलीबाज उमेदवार घाबरल्यामुळे अशा खोट्या अफवा पसरवत असल्याचा डॉ. खुंटेमाटे यांचा आरोप.

वरोरा :-

विधानसभा निवडणुकीत शेवटच्या दिवशी काय होईल आणि अफवा फसरवून कुणाचा गेम केल्या जाईल याचा अंदाज कुणालाही नसतो असाच एक गेम प्लान वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात झाला असून एक जाहीर पाठिंबा असलेले पत्र व्हायरलं झाल्याने दोन अपक्ष उमेदवारामध्ये चांगली निवडणूक वाकयुद्ध झाले असल्याचे दिसत आहे.

काय आहे जाहीर पाठिंबा पत्र?

अपक्ष उमेदवार डॉ चेतन खुंटेमाटे यांनी अपक्ष उमेदवार मुकेश जीवतोडे यांना पाठिंबा दिल्याचं पत्र प्रसारमाध्यमावर फिरत असतांना डॉ चेतन खुंटेमाटे यांना ते कळालं आणि त्यांनी हे पत्र फेक असल्याचं स्पष्ट केलं, दरम्यान त्या पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले की “घराणेशाहीचा बीमोड व्हावा आणि मतदार संघात वाढलेली गुंड गर्दी संपविण्यासाठी आपले अपक्ष उमेदवार डॉ. चेतन खुटेमाटे यांनी काळाजी गरज ओळखून आपले जिंकून येणारे अपक्ष उमेदवार श्री. मुकेश भाऊ जीवतोडे यांना अत्यंत मोठ्या मनाने जाहीर पाठिंबा घोषित केला असून डॉ चेतन खुटेमाटे साहेबांचे सर्व थरातून आभार व्यक्त होत आहे .आता विजय आपलाच आहे….. (एक राहू तरच सेफ राहू) लक्षात असू द्या बटन क्रमांक १३ प्रेशर कुकर असे पत्रात नमूद करण्यात आले,

या पत्राच्या अनुषंगाने ऊस शेतकरी या बोधचिन्हावार उभे असलेले अपक्ष उमेदवार डॉ चेतन खुंटेमाटे यांनी या पत्रातील मजकूराचा जोरदार विरोध करून काही घाबरट पळकुटे उमेदवार हे पराभवाच्या भीतीने खोटेनाटे मेसेजेस पसरवून मी कुण्यातरी उमेदवाराला समर्थन (पाठिंबा) दिल्याची अफवा फसरवत आहे त्यामुळे असल्या अफवाना बळी पडू नका असे आवाहन करून तुमच्या प्रेमाचा कधीही अनादर करणार नाही व आपल्या पाठिंब्याने मी ही निवडणूक जिंकत असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे.

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मोठ्या संख्येने असलेला धनुजे कुणबी समाज आता या समाजातील अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने मताचे मोठ्या प्रमाणात विभाजन होत आहे. दरम्यान डॉ चेतन खुंटेमाटे यांनी या विधानसभा क्षेत्रात आपल्या आरोग्य जनसेवेच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केल्यामुळे त्यांना गावागावात मोठा पाठिंबा मिळतं असल्याने यांचा अपक्ष उमेदवार मुकेश जीवतोडे यांना पाठिंबा कसा काय होऊ शकतो हा मोठा प्रश्न असून केवळ मतांचं विभाजन होऊ नये यासाठी केलेला हा कारनामा आहे असं डॉ चेतन खुंटेमाटे यांनी आपल्या एक मिनिटाच्या व्हिडीओ क्लिप च्या माध्यमातून समोर आणून त्यांनी जनतेला आवाहन केले की मी निवडणुकीत माघार घेतली नसून मी मोठया मताधिक्याने निवडून येईल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here