माढेळी परिसरातील अनेक गावात रेती स्टॉक महसूल प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष का?
माढेळी प्रतिनिधी :-
वरोरा तालुक्यातील बोरी, कोहपरा, सोईट नदी घाटातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असल्याची गंभीर बाब समोर आली असून या रेती चोरीला तहसील प्रशासन व स्थानिक तलाठी मंडळ अधिकारी यांची मूक संमती असल्याचे दिसत आहे. एरवी रेती चोरी करणाऱ्या गाडयांना पकडण्यासाठी तलाठी मंडळ अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार हे सरकारी गाड्यानी फिरून रात्रीच्या वेळी सुद्धा जागरण करतात मात्र अनेक ठिकाणी रेतीचे ढिगारे असतांना आणि त्याबद्दल तक्रार केल्यानंतर सुद्धा रेती जप्त केल्या जात नसेल तर रेती चोरी महसूल प्रशासनाच्या संमतीने होत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे सरकारी संमतीची लूट करण्यात महसूल प्रशासनाचे अधिकारी गुंतले असल्याने त्यांचेवर निलंबानाची कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी सर्वत्र होत आहे.
माढेळी क्षेत्रातील अनेक गावात रेतीचे ढिगारे बांधकाम करण्यासाठी दिसत आहे, यामध्ये निलजई येथील एका विवादीत बांधकामाकरिता चोरीची रेती टाकण्यात आली होती आणि याविषयी तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात आली मात्र याकडे कुणीच लक्ष दिलं नाही याचा अर्थ रेती चोरी करणाऱ्यांना कुठेतरी महसूल प्रशासनाच पाठबळ असल्याचं दिसत असल्याचे दिसत असल्याने आता महसूल अधिकारी कर्मचारी हेच गुन्हेगार म्हणून समोर येत असल्याने रेती चोरणाऱ्यावर कारवाई कोण करेल हा प्रश्न उपस्थित होत आहे.
माढेळीत रेतीची गाडी सोडल्याची चर्चा?
एकीकडे रेती चोरी खुलेआम सुरु असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळून सुद्धा व तशा लेखी आणि भ्रमणध्वनीवरून तक्रारी दिल्या जात असतांना महसूल प्रशासन निद्रावस्थेत असतं आणि दुसरीकडे पहाटे महसूल कर्मचारी सेटिंग करिता रेती चोरीचा ट्रॅक्टर चा पाठलाग करून ट्रॅक्टर पकडतात व सोडून देतात अशी चर्चा होत असतांना आज पहाटे असाच प्रकार घडला असल्याची माहिती असून ते कोण तलाठी मंडळ अधिकारी किंवा कोतवाल आहे याची माहिती समोर येणार आहे.